रशियाने संयुक्त राष्ट्रात इराणला पाठिंबा देत, स्ट्रेट ऑफ होर्मुझ मार्ग कायदेशीररित्या बंद करण्याचा अधिकार असल्याचे त्याला असल्याचे सांगितले. तर अमेरिकेची तुलना २१ व्या शतकातील समुद्री डाकू अशी केली.
एकीकडे संयुक्त राष्ट्रात रशियाने इराणची बाजू घेतली, तर दुसरीकडे सेंट पीटर्सबर्ग येथे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी इराणचे परराष्ट्रा मंत्री अब्बास अराघची यांची भेट घेतली आहे. या भेटीने रशिया आणि इराणचे संबंध केवळ राजनैतिक नसून सागरी भागीदारीचेही आहेत आणि रशिया इराणच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
संयुक्त राष्ट्रातील रशियाचे स्थायी प्रतिनिधी वासिली नेबेंजिया यांनी इराणच्या बाजूने रशियाची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी अमेरिकेसह पाश्चात्य देशांना सुनावले. त्यांनी म्हटले की, जे देश स्वत:ला आंतरराष्ट्रीय कायद्याचा रक्षक समजतात, तेच देश समुद्रात लुटमार करत आहेत. पाश्चात्य देशांची इराणवर दबाव टाकण्याची रणनीती ही समुद्री डाकूसारखी असल्याचे त्यांनी म्हटले.
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, इराणला त्यांच्या सुरक्षेसाठी समुद्री नाकेबंदी सार्वभौम अधिकार आहे. अमेरिका आणि युरोपीय देश स्वत:च्या सोयीनुसार, आंतरराष्ट्रीय कायद्याचा वापर करतात असाही आरोप करण्यात आला. रशियाच्या मते, इराणने त्यांच्या सुरक्षेसाठी समुद्रात नाकेंबदी केली तो धोका आणि हेच पाश्चात्य देशांनी केले तर त्याला नियम मानले जाते जो उघडपणे पाखंडीपणा आहे असे रशियाने म्हटले.
सध्या रशियाच्या या भूमिकेमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुझ हा मार्ग जागतिक व्यापारासाठी महत्त्वाचा आहे. परंतु यावर इराणचे नियंत्रण योग्य असल्याचे रशियाने म्हटल्याने येणाऱ्या काळात तेल पुरवठा आणि सागरी सुरक्षेवरुन महासत्तांमध्ये संघर्ष सुरु होण्याची शक्यता आहे. सध्या संपूर्ण जगाचे लक्ष आता अमेरिका यावर काय भूमिका घेते याकडे लागले आहे.






