मुंबई : अभिनेता अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती यांची मुख्य भुमिका असलेला चित्रपट ‘द काश्मीर फाइल्स’ 11 मार्चला रिलीज होणार आहे. अनुपम खेर यांनी ट्विटरवर पोस्ट करत चित्रपटाच्या नवीन रिलीजची तारीख जाहीर केली. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती व्यतिरिक्त अनुपम, भाषा सुंबली, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि पुनीत इस्सार यांच्यासारखे कसलेले कलाकार देखील आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन विवेक रंजन अग्निहोत्री यांनी केलं आहे.
[read_also content=”https://www.navarashtra.com/state/actor-praveen-kumar-sobti-of-wins-gold-medal-in-asian-games-gets-a-job-in-bsf-nrps-234728.html महाभारताचे भीम प्रवीण कुमार सोबती यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत जिंकलय सुवर्णपदक, BSF मध्ये केलीये नोकरी”]
‘द कश्मीर फाइल्स’ 11 मार्चला थिएटरमध्ये रिलीज होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘आम्ही कश्मीर नरसंहाराची कहाणी मोठ्या पडद्यावर आणत आहोत. ‘द काश्मीर फाइल्स’ 11 मार्च 2022 रोजी रिलीज होत आहे. यासोबत #RightToJustice म्हणजेच राईट टू जस्टिस हा हॅशटॅगही वापरण्यात आला आहे.
1990 च्या दशकाच्या सुरुवातीला कश्मीरच्या बंडखोरीमुळे काश्मिरी हिंदूंच्या पलायनाची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. 2019 मध्ये ‘द ताश्कंद फाइल्स’ रिलीज झाल्यानंतरच विवेक अग्निहोत्रीने या चित्रपटावर काम सुरू केले. शेतकरी आंदोलनादरम्यान हा चित्रपटही चर्चेत आला होता. वास्तविक योगराज सिंह देखील या चित्रपटात होते. मात्र शेतकरी आंदोलनादरम्यान त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना चित्रपटातून वगळण्यात आले. त्याच्या जागी मिथुन चक्रवर्तीला कास्ट करण्यात आले.