मुंबई : विद्यार्थ्यांच्या फि तसेच शुल्कवाढ (Student fee and education charge) विरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. (NCP youth congress) विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थतीचा विचार न करता आयआयटी, पवई (IIT Powai) यांनी एकत्रित ४५% वाढ केल्याच्या विरोधात आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे वकील अमोल मातेले (Amol Matele) यांनी संस्थेच्या मुख्य प्रवेद्वाराजवळ निदर्शने करीत प्रशासनाच्या विरोधात घोषणा देऊन जोरदार आंदोलन (Protest) केले. शुल्कवाढ रद्द करण्यासाठी विद्यार्थी गेल्या आठ दिवसापासून आंदोलन करीत आहेत, (Students have been protesting for the last eight days to cancel the fee hike) परंतु अद्यापही त्यांची प्रशासनाकडून दखल घेण्यात आलेली नाही. अचानकपणे मनमानी करून शुल्कवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य कुटुंबातील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेऊ शकणार नाही, म्हणून अशा प्रकारची मनमानी खपवून घेतली जाणार नाही, असं वक्तव्य वकील अमोल मातेले यांनी यावेळी केले.
[read_also content=”मोठा अनर्थ टळला! आयएसआयच्या एका संशयित दहशतवाद्याला दिल्लीतून अटक https://www.navarashtra.com/india/isis-terrorist-arrested-from-new-delhi-313074.html”]
दरम्यान, काल पासून पाच विदयार्थी उपोषणाला बसले आहेत. विध्यार्थ्यांचा इरादा आहे की, त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच राहील, त्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पूर्णपणे पाठिंबा राहील, असे सांगत संस्थेने शुल्कवाढ रद्द न केल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा एडवोकेट अमोल मातेले यांनी दिला आहे. यावेळी आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रम खामकर, विद्यार्थी अध्यक्ष ठाणे प्रफुल कांबळे, विक्रोळी तालुका अध्यक्ष कैलास कुशल, कुतुब आलम, ईशान खान, विशाल इंगळे, लक्ष्मण पवार, राहुल टिकेकर जीत सिंग तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.