मुंबई – पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने वापरण्यावर भर द्यावा, असे निर्देश पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतेच दिले होते. शासकीय कार्यालयात इलेक्ट्रिक वाहनेच वापरा, असे निर्देश असताना ही मुंबईत चाॅर्जिग स्टेशनची सुविधा अधिक प्रमाणात उपलब्ध नसल्याने इलेक्ट्रिक वाहने भाड्याने घेणे मुंबई महापालिकेसाठी अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहने भाड्याने घेण्याआधीच मुंबई महापालिका स्लायडिंगला गेल्याचे दिसून येत आहे.
पालिका अधिकाऱ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या वापरासाठी भाड्याने वाहाने घेण्यात येतात. मुंबई महापालिकेच्या ताफ्यात भाडेतत्त्वावरील २१० वाहने आहेत. या वाहनांच्या भाड्यापोटी मुंबई महापालिका प्रशासनाला वर्षांला ८ कोटी रुपये मोजावे लागतात. परंतु भाडे कराराची मुदत संपुष्टात येत असल्याने पालिकेने भाडेतत्त्वावरील वाहने घेण्यासाठी २२ डिसेंबर रोजी निविदा मागवल्या होत्या. तर राज्य सरकारने २९ डिसेंबर रोजी शासकीय कार्यालयात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा असे, निर्देश जारी केले. राज्य सरकारच्या निर्देशामुळे पालिकेने वाहने भाड्याने घेण्यासाठी फेरनिविदा मागवण्याचा निर्णय घेतला असून जुन्या कंत्राटदाराला जुलै २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
[read_also content=”पतीच्या रूपात सैतान! एका हातात पत्नीचं कापलेलं मुंडकं, हातात सुरा आणि चेहऱ्यावर हास्य ; वाचा काय आहे प्रकरण https://www.navarashtra.com/world/satan-as-husband-wifes-severed-head-in-one-hand-security-in-hand-and-smile-on-face-read-what-is-the-case-nrab-235294.html”]
मुंबईच वाहानांच्या चार्जिंगची उपलब्धता, वाहतुक परवाना असलेली ईलेक्ट्रीक वाहानांची मर्यादा यामुळे सुरवातीलाच ईलेक्ट्रीक वाहाने न घेता इतर इंधनावर चालणारी वाहाने घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मात्र त्यानंतर टप्प्या टप्प्याने बॅटरी इलेक्ट्रीक वाहाने रुपांतर करणे योग्य ठरेल, अशी भुमिका प्रशासनाने मांडली आहे.मात्र आता पालिका १ वर्षांसाठी वाहाने भाडे तत्वावर घेणार नसून सात वर्षांसाठी ग्रुप निहाय वाहान सेवा भाडेतत्वार घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, तसा निविदा मसुदा तयार केला जात असल्याचे प्रशासनाने प्रस्तावात नमुद केले आहे.
[read_also content=”एवढा राग… जावयाने सासूला उचलून डायरेक्ट १६० फूट खोल विहिरीत फेकले; अकोल्यात हत्येचा थरार https://www.navarashtra.com/maharashtra/son-in-law-picked-up-his-mother-in-law-and-threw-her-directly-into-a-160-feet-deep-well-murder-scandal-in-akola-235321.html”]