Rohit Sharma Captain For Sri Lanka ODI Series
Rohit Sharma Captain For Sri Lanka ODI Series : सध्या भारतीय क्रिकेटमध्ये काय चालले आहे हे कोणालाही समजत नाही. टीम इंडियाला 27 जुलैपासून श्रीलंकेत तीन सामन्यांची टी-20 आणि तेवढीच एकदिवसीय मालिका खेळायची आहे. मात्र या दौऱ्यासाठी बीसीसीआयने अद्याप संघ जाहीर केलेला नाही. भारताच्या पुढील टी-२० कर्णधाराबाबतही संदिग्धता आहे. दरम्यान, रोहित शर्माने नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा सल्ला स्वीकारला असून तो श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत कर्णधार असेल अशी बातमी समोर आली आहे.
वन-डे मालिकेत रोहितच सांभाळणार टीम इंडियाची कमान
आता रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध असल्याची पुष्टी झाली आहे. मात्र, याआधी अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, रोहित शर्मा सलग सहा महिने क्रिकेट खेळल्यामुळे श्रीलंकेतील एकदिवसीय मालिकेत खेळणार नाही. श्रीलंकेतील एकदिवसीय मालिकेत केएल राहुल टीम इंडियाची कमान सांभाळणार असल्याचीही बातमी आली होती. श्रीलंकेतील वनडे मालिकेत रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार असेल. याआधी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी पुष्टी केली आहे की रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आयसीसी 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही खेळणार आहे.
विराट आणि बुमराहने देखील बीसीसीआयला कळवलेय
विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांच्याबाबतही अपडेट आले आहे. रिपोर्टनुसार, हे दोन्ही स्टार खेळाडू श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळणार नाहीत. रिपोर्टनुसार, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत विश्रांती देण्यात येणार आहे.
टीम इंडियाची आज घोषणा होऊ शकते.
टीम इंडियाची घोषणा
श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० आणि तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी आज टीम इंडियाची घोषणा होऊ शकते. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि सचिव जय शाह यांच्यासह निवड बैठकीचा भाग असतील. वृत्तानुसार, श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत सूर्यकुमार यादव टीम इंडियाची धुरा सांभाळणार आहे. तर हार्दिक पांड्या फक्त टी-20 मालिका खेळणार आहे. त्याने वैयक्तिक कारण सांगून वनडे मालिकेतून विश्रांती मागितली आहे.