सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : सांगली शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने मारुती चौक सांगली येथे मनी लॉडरींग प्रकरणात ईडीने अटक केलेल्या अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा द्यावा म्हणून निदर्शने करून आंदोलन करण्यात आले.
यावेळी 1993 साली मुंबई बॉम्बस्फोटां मध्ये मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. व भ्रष्टाचारी देशद्रोही मंत्री नबाब मलिक यांच्या प्रतिमेस चप्पल हार घालून निषेध व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी माजी आमदार नितीनराजे शिंदे, भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य प्रकाश तात्या बिरजे, जिल्हा सरचिटणीस अविनाश मोहिते, नगरसेवक सुब्रावतात्या मद्रासी, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष प्रियानंद कांबळे, भाजपा ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष उदय मुळे, भाजपा व्यापार आघाडीचे उपाध्यक्ष रवींद्र वाढवणे, सतीश पवार, भाजपा उपाध्यक्ष निलेश हिंगमिरे, भाजपा युवा मोर्चाचे शुभम चव्हाण, कामगार नेते चंद्रकांत सूर्यवंशी, उदय बेलवलकर, संतोष कारंडे, महिला मोर्चाचे उपाध्यक्षा माधुरी वसगडे, रेखा पाटील, आरती ऐनापुरे, कृष्णात कडणे, देशपांडे, राजेंद्र कांबळे, प्रकाश पोतदार, संजय पाटील, रमेश जाधव, विकास माने यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.