कोकणचा शिमगोत्सव (फोटो- सोशल मीडिया)
कोकणात शिमगोत्सवाची मोठी धामधूम
देवखेळे करतात ग्रामदेवतेचा गजर
शिमगोत्सव सर्वांच्या आकर्षणाचा विषय
गणेश किर्वे/वरवेली: कोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिमगोत्सवात पहिल्या होळीपासून बाहेर पडणारे खेळे हा येथील शिमगोत्सव सर्वांच्या आकर्षणाचा विषय असतो. पहिल्या होळीला आपल्या गावामध्ये होळी साजरी केल्यानंतर प्रत्येक गावागावातील देवखेळे ग्रामदेवतेचा गजर करतात. दुसऱ्या होळीला गाव भोवनीसाठी बाहेर पडतात. अनवाणी पायाने गावागावात प्रत्येक घराघरातून आपल्या ग्रामदेवतेचा गजर करतात. हे देव खेळे फिरत असतात. यातील संकासूर व गोमूचा नाच लहान थोरांसाठी अतिशय आकर्षणाचा विषय असतो. बाहेर गावाहून येणारे पर्यटक देखील या संकासुराच्या मोहात पडतात.
सोशल मिडियात वावरत असलेल्या युगात गुहागरसारख्या तालुक्यात प्रसिद्ध शिमगोत्सवाच्या निमित्ताने काही गावकरी मंडळी आपल्या पिढीजात संकासूर नमनाची धार्मिक परंपरा जतन करतात. ती सादर करण्याची परंपरा आजही जपत आहेत.
कोकणकरांसाठी ‘लालपरी’ सज्ज; आरक्षण फुल्ल अन्…; MSRTC तब्बल ‘इतक्या’ गाड्या सोडणार
या परपरेसमोर सर्व जाती धर्मातील मंडळीही तेवढयाच श्रद्धापूर्वक नतमस्तक होतात. आपल्या दारी आलेल्या संकासूर नमन मंडळाची आरती करून, त्यांना दक्षिणा देवून त्यांचे आशिर्वाद घेतात. ही प्रथा आजही मोठया भक्तीभावाने आणि श्रध्देने जपली जाते. कोकणात विविध सण-उत्सव मोठ्या भक्ती भावाने आणि श्रद्धाळू भावनेने साजरे करण्याची परंपरा आहे. येथील गणेशोत्सवाबरोबरच शिमगोत्सवाला फार मोठे स्थान आहे. हे उत्सव कोकणी माणूस दरवर्षी आपल्या कुटुंबीयासह आनंदाने साजरा करतो.
या दिवसात नोकरी-धंदया निमित्ताने बाहेर गावी म्हणजेच मुंबई, पुणे सारख्या मोठमोठ्या शहरामध्ये असलेला माणूस खास सुट्टी काढून आपापल्या गावी येतो. शिमगोत्सवात गावागावातील वाडीस्तरावर होळी पेटवणे, रात्रीच्या चांदण्यात आट्यापाट्या व अन्य लालमातीतील खेळ खेळणे, खादयपदार्थाचा एकत्रित बसून फडशा पाडत गप्पा मारणे, त्याचबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये होळी सणाच्या दिवशी संकासूरावे नमन, काटखेळ, लोकनाट्य, गणगौळण, तमाशा ही पारंपारीक लोककला सादर करण्याची पुर्वापार परंपरा आहे.
Pratap Sarnaik : डिझेल खरेदीत हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही; परिवहनमंत्र्यांचा सज्जड दमकोकणासाठी एसटीचा धमाका
आजच्या सोशल मिडियाच्या दुनियेतही गुहागर तालुक्यातील प्रत्येकजण याकडे धार्मिक आणि श्रद्धाळू भावनेने पाहत असल्याने संकासूराच्या नमनाची ही लोककला अजुनही येथील लोकांवर प्रभावी ठरत आहे. त्यामुळेच शिमगोत्सवाची पहिली होळी पेटली की, दुसऱ्या होळीपासून तालुक्यातील वरवेली, वेळंब, पालशेत, पालपेणे, रानवी, पवारसाखरी, वेळंब-पांगारी आदी बहुतांश गावातून हे खेळे गावभौवनीसाठी बाहेर पडतात.






