चंदीगड- पंजाबमध्ये काँग्रेस पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाच्या नेत्याची घोषणा होण्यापूर्वीच, नवजोतसिंग सिंद्धूंनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींवर हल्लाबोल केला आहे. ‘पंजाबात कमकुवत मुख्यमंत्री व्हावा, अशी वरिष्ठांची इच्छा आहे. जो मुख्यमंत्री त्यांच्या सांगण्यावरुन ता-ता थय्या नाचेल. मग वरिष्ठ सांगतील की नाच मेरी बुलबुल तुम्है पैसा मिलेगा. पहिल्यांदा हे हात पिरगाळतात आणि नंतर त्रास व्हायला लागल्यावर सोडून देतात’ अशी जोरदार टीका सिद्धूंनी काँग्रेसच्या वरिष्ठांवर केली आहे. त्यानंतर जमलेल्या गर्दीने नवजोतसिंग सिंद्धूंच्या नावाने घोषणाबाजी केली.
पंजाबमध्ये ६ फेब्रुवारीला मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणा होणार आहे. त्यासाठी राहुल गांधी लुधियाना येथे होणाऱ्या सभेत येण्याची शक्यता आहे. सध्या मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धू आणि सध्याचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी या दोघांची दावेदारी आहे.
[read_also content=”मधुबालाच्या 96 वर्षीय बहिणीला सुनेने काढले घराबाहेर https://www.navarashtra.com/movies/madhubalas-96-year-old-sister-was-kicked-out-of-the-house-nrps-232550.html”]
गुरुवारी रात्री अमृतसरमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी सिद्धू यांनी संवाद साधला. ‘जर नवा पंजाब निर्माण करायचा असेल तर ते मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. जसा मुख्यमंत्री असेल तसेच राज्य निर्माण होत असते. या दोन मुख्यमंत्र्यांनी २५-२० वर्षांत पंजाबची दुर्दशा करुन ठेवली आहे. यावेळी मुख्यमंत्री तुम्हाला निवडायचा आहे. जर इमानदार व्यक्तीला संधी मिळाली, तर तळापर्यंत इमानदारी झिरपेल. जर चोर माणसाला संधी मिळाली तर सगळं संपेल. माझे बोलणे लक्षात ठेवा.’
[read_also content=”मधुबालाच्या 96 वर्षीय बहिणीला सुनेने काढले घराबाहेर https://www.navarashtra.com/movies/madhubalas-96-year-old-sister-was-kicked-out-of-the-house-nrps-232550.html”]
सिंगापूरमध्ये भ्रष्टाचार कसा संपवण्यात आला याचे उदाहरण सिद्धूंनी दिले. तिथे वरिष्ठ पातळीपासून यासाठी सुरुवात झाली. मंत्री सुट्टी घालवण्यासाठी कुणा व्यापाऱ्यासोबत गेला, तर एयरपोर्टवरच त्याच्याकडून मंत्रीपद काढून घेण्यात आले. आणि त्याची रवानगी जेलमध्ये करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
जर मुख्यमंत्री झाले नाहीत, तर पुन्हा जुन्या प्रोफेशनमध्ये परतू, असे सिद्धू यांच्या पत्नी नवजोत कौर यांनीही या आधी सांगितले आहे. तिथे सिद्धू प्रतितास २५ लाख रुपये कमवतात, तर आपणही महिन्याला ५-१० लाख कमवत असल्याचे वक्तव्य कौर यांनी केले होते. यावरुन ट्रोल झाल्यानंतरही नवजोत सिद्धू हे हिरो आहेत आणि हिरोच राहतील, अशी प्रतिक्रिया नवजोत कौर यांनी दिली होती.
पक्षश्रेष्ठींवर टीका करण्याची ही सिद्धू यांची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळाले नाही तर दगडावर दगड आपटेल, असे संकेत त्यांनी दिले होते. केवळ उभ्याचा बैल बनवू नका, तर निर्णय घेण्याची ताकद द्या, असेही भर सभेत त्यांनी राहुल गांधींना ऐकवलेले आहे.
[read_also content=”फेसबुकचे शेअर्स गडगडले : झुक्याभाऊं लय वाईट झालं; फेसबुकला एका दिवसात 200 अरब डॉलरचे नुकसान, भारतावर फोडलं खापर https://www.navarashtra.com/business/mark-zuckerberg-meta-shares-crash-more-than-26-percent-biggest-single-day-wipeout-in-history-nrvb-232560.html”]