अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा करावा, अन्यथा आम्ही मतोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करू या राणा दाम्पत्याच्या वक्तव्यानंतर नवनीत राणा व रवी राणा आणि शिवसैनिकात राजकीय ठिणगी उडाली आहे. आज राणा यांच्या अमरावतीतील गंगा सावित्री या निवसस्थानासमोर शिवसैनिक हजारोच्या संख्येने गेले होते. मात्र पोलिसांनी त्यांना राणा यांच्या घराच्या आधीच अडवले यावेळी पोलीस व शिवसैनिकात प्रचंड झटापट झाली.
यावेळी राणा दाम्पत्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. तर दुसरीकडे राणा यांच्या घरासमोर राणा समर्थकांनी शिवसैनीकाचे स्वागत करण्यासाठी सज्ज असल्याचं पाहायला मिळालं. यावेळी राणा समर्थकांनी त्यांच्या घरासमोर जमत हातात हात, हनुमानजीची प्रतिमा तसेच शरबत घेऊन त्यांच्या स्वागतासाठी सज्ज होते तर राणा यांना आपल्या घरासमोर हनुमान चालीसाही लावली मात्र शिवसैनिक यांना पोलिसांनी राणा यांच्या घरापर्यंत येऊ दिले नाही.
[read_also content=”हनुमान जयंतीला राज्यात शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला पण आम्ही त्यांचा डाव उधळून लावला – संजय राऊत https://www.navarashtra.com/maharashtra/hanuman-jayanti-tried-to-disrupt-peace-in-the-state-but-we-thwarted-his-plan-says-sanjay-raut-270024.html”]