सुषमा अंधारे (फोटो- ट्विटर)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावर राजकारण तापले आहे. काल राणे-ठाकरे समर्थकांमध्ये देखील राजकोट किल्ल्यावर जोरदार राडा झाला. पुतळा कोसळल्याचे राजकारण करी नये असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस म्हणत आहेत. तसेच केवळ विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून याचे राजकारण केला जात असल्याचा आरोप फडणवीसांनी केला. काल खासदार नारायण राणे आणि निलेश राणे विरुद्ध ठाकरे समर्थकांचा जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. एकेकाला घरात घुसून मारेन असे वक्तव्य नारायण राणे करताना पाहायला मिळालं. त्यावरून आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.
नारायण राणेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. राजकोट किल्ल्यावर सुषमा अंधारे यांनी आज पुण्यात आंदोलन केले. यावेळेस चार आणे, बाराणे , अटक करा नारायण राणे अशा घोषणा सुषमा अंधारे यांनी दिल्या. दरम्यान पुण्यातील आंदोलनाचा व्हिडीओ शेअर करत सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत.
सुषमा अंधारे या ‘एक्स’ वर म्हणाल्या, ”पत्रकार सामान्य नागरिक पोलीस यांच्याशी सतत दमदाटीची भाषा, गुंडागर्दी, सामाजिक प्रदूषण पसरवणाऱ्या राणेंवर गुन्हे दाखल झाले नाही तर याचा अर्थ या तीनही कळसूत्री बाहुल्यांचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस यांना जाणीवपूर्वक महाराष्ट्र अशांत करायचा आहे.”
हे राज्य गुंडशाहीचे.. हे राज्य ठोकशाहीचे करू पुन्हा स्वप्न साकार आम्ही
आणू राज्य शिवशाहीचे..@ShivSenaUBT_
@ShivsenaUBTComm pic.twitter.com/mNriLObYxl — SushmaTai Andhare (@andharesushama) August 28, 2024
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे प्रकरण आणि काल तिथे झालेल्या राड्याप्रकरणी सुषमा अंधारे यांनी पुण्यात आंदोलन केले. यावेळी त्यांनी नारायण राणे यांना अटक करण्याची मागणी केली. तसेच देवेंद्र फडणवीसांना जाणीवपूर्वक महाराष्ट्र अशांत करायचा आहे असा गंभीर आरोप त्यांनी येव्हल्स केला. सुषमा अंधारे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन भाजप, नारायण राणेंवर हल्लाबोल केला.
पत्रकार परिषदेत बोलताना सुषमा अंधारे यांनी नारायण राणेंचा इतिहासच वाचून दाखवला. त्यानंतर त्यांनी काल घरात घुसून एकेकाला मारेन असे वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांना अटक करावी अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान काल राजकोट किल्ल्यावर राणे-ठाकरे समर्थक एकमेकांना भिडले. महाराजांचा पुतळा कोसळला त्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच पेटले आहे.