सोलपुरात 10 बांग्लादेशी नागरिकांना अटक (फोटो- istockphoto)
भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या चार बांगलादेशींना ठोकल्या बेड्या
शिवाजीनगर पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाला (एटीसी) मोठे यश मिळाले आहे. बनावट कागदपत्रांवर भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशींना एटीसीने अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक आणि एटीसी प्रमुख विक्रांत शिंदे यांनी हुसेन मोफिजुल शेख (वय २२), लिटन मोफिजुल शेख (वय २४), अन्सार अली सरदार (वय ४४), सुलेमान रहीम शेख (वय ३४) अशी चार स्थलांतरितांची ओळख पटवली.
भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या चार बांगलादेशींना ठोकल्या बेड्या; एटीएसची कारवाई
ओळख लपवून मुंबईच्या विविध भागात मजूर म्हणून काम करत होता, असे उपनिरीक्षक विक्रांत शिंदे यांनी सांगितले. गोवंडीतील लोटस जंक्शन येथील जलेबी दुकानासमोर चार बांगलादेशी नागरिक येत असल्याची गुप्त माहिती आम्हाला मिळाली होती. त्या आधारे, एटीसी सेलचे हवालदार निकम, शिंदे आणि पाटील यांनी सापळा रचला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बापूराव देशमुख यांनी म्हटले की, ‘आतापर्यंत आम्ही 80 हून अधिक लोकांची पडताळणी केली आहे. आम्हाला संशय आहे की ते बांगलादेशी आहेत आणि भारतात बेकायदेशीरपणे राहत आहेत. त्यांच्या माध्यमातून पोलिस येथे आणखी किती लोक लपले आहेत आणि त्यांना बेकायदेशीरपणे भारतात कोण आणत आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत’.