गौतमी पाटील (Gautami patil) म्हण्टलं की तिचा डान्स (Dance) आणि तिच्या कार्यक्रमात होणारा गोंधळ हे शब्द कानावर पडतात. गौतमीच्या डान्सपेक्षा तिच्या कार्यक्रमाची सगळीकडे चर्चा होते. गल्लीबोळ्यापासुन शहरापर्यंत चर्चेत राहणाऱ्या गौतमीला कार्यक्रमात बोलवायचे का असा मिश्कील सवाल विरोधीपक्ष नेते अजित (ajit pawar) पवार यांनी एका कार्यक्रमा दरम्यान केला. ‘मग कार्यक्रमात पाटील बाईला बोलवायचे का? काय तिचे नाव गौतमी’, असे म्हणत विरोधीपक्ष नेते अजित पवार गौतमी पाटीलचे नाव घेतले. त्यांनी असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.
[read_also content=”सुट्टीत लग्नात आलेल्या जवानानं जळणारा फटका ठेवला तोंडात; स्फोट होऊन जागीच मृत्यू, गार्ड ऑफ ऑनर देऊन अंत्यसंस्कार https://www.navarashtra.com/india/a-soldier-who-came-to-a-wedding-on-vacation-put-a-burning-blow-in-his-mouth-death-on-the-spot-due-to-explosion-nrps-391660.html”]
बारामतीत एक कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी बोलताना एका लग्नाच्या तिथीवरुन ते बोलत होते त्यावेळी नंतर अजित पवारांनी गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवायचा का? असं म्हणत टोला मारला. तसेच यावेळी सगळ्यांना पाहता येईल असे काम करण्याचा सल्लाही तिला दिला विशेष म्हणजे यापुर्वी देखील अजित पवारांनी गौतमीच्या नृत्यावरुन आक्षेप घेतला होता.
गौतमी पाटील लावणची नृत्याचे कार्यक्रमात नेहमी काही ना काही गोंधळ होत असतो. तिच्या कार्यक्रमात येणाऱ्या चाहत्यांनी अनेकदा राडा केलेला आहे. कधी कार्यक्रम स्थळा धुडघुस घालणे किंवा खुर्च्याची तोडफोड करणे असे प्रकार नेहमीच घडत असतात. त्यामुळे तीच नाव कायम चर्चेत असतं. तिच्या नृत्याने सर्वांनाच लहानापासुन मोठ्यांना सगळ्यांना वेड लावले आहे. राज्यात अनेक ठिकाणी तिला कार्यक्रमासाठी बोलवतात. तिच्या नृत्यावरुन तिला ट्रोल केलं जातानामात्र आपण फक्त लावणीच नाही तर नृत्याचे इतर सर्व प्रकार सादर करतो आणि नृत्यावेळी अश्लिल हावभाव पूर्णपणे बंद केल्याचं गौतमी पाटीलनं म्हटलं होतं.
गौतमी पाटील आणि इंदूरीकर महाराज दोघांनाही ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांनी खडे बोल सुनावले आहेत. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना सदानंद मोरे म्हणाले, दोघांनाही आपापल्या क्षेत्रातील लोकं नावे ठेवतात. गौतमी पाटीलने लावणीची संस्कृती बिघडवली आणि वारकरी सांप्रदायातील लोकंही इंदूरीकर महाराजांनाही नावे ठेवतात. लावणीत पदर ढळू दिला जात नाही, गौतमी करते तशी लावणी नसते, असे म्हणत मोरे यांनी खोचक टोला लगावला आहे.