शार्दुल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईचा धमाकेदार विजय; अरुणाचल प्रदेशचा 73 धावांवर ऑलआऊट, 9 विकेट्स राखून मिळवला विजय
Vijay Hazare Trophy : विजय हजारे ट्रॉफीच्या या मोसमाच्या तिसऱ्या टप्प्यात मुंबईने अरुणाचल प्रदेशचा एकतर्फी पराभव केला. या सामन्यात श्रेयस अय्यरच्या जागी मुंबईचे नेतृत्व शार्दुल ठाकूरकडे होते. शार्दुल ठाकूरच्या नेतृत्वाखाली मुंबईने प्रतिस्पर्धी संघाचा ७३ धावांत ऑलआऊट करीत सामना ९ विकेटने जिंकला.
अरुणाचल प्रदेशचा एकतर्फी पराभव
विजय हजारे ट्रॉफीच्या या मोसमाच्या तिसऱ्या टप्प्यात मुंबईने अरुणाचल प्रदेशचा एकतर्फी पराभव केला. या सामन्यात श्रेयस अय्यरच्या जागी मुंबईचे नेतृत्व शार्दुल ठाकूरकडे होते. शार्दुल ठाकूरच्या नेतृत्वाखाली मुंबईने प्रतिस्पर्धी संघाचा ७३ धावांत पराभव करत सामना ९ विकेटने जिंकला. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि अरुणाचल प्रदेशचा संघ 32.2 षटकात केवळ 73 धावांवर गारद झाला. मुंबईने अवघ्या ५.३ षटकांत एक विकेट गमावून हे लक्ष्य गाठले.
एकाही फलंदाजाचे 10 रन नाही
या सामन्यात गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर मुंबईकडून शार्दुल ठाकूर, हर्ष तन्ना, हिमांशू सिंग आणि अथर्व अंकोलकर यांनी प्रत्येकी 2, तर रेस्टन डायस आणि श्रेयांश शेडगे यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. अरुणाचल प्रदेशच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाल्यास, १७ धावा करणाऱ्या याव निया आणि १३ धावा करणाऱ्या तेजी डोरियालाच दुहेरी आकडा गाठता आला. याशिवाय एकाही फलंदाजाला 10 धावांपर्यंत मजल मारता आली नाही.
लक्ष्यासाठी खेळपट्टीवर उतरलेल्या मुंबई संघाला सलामीवीर अंगकृष्ण रघुवंशी याने चमकदार सुरुवात करून दिली आणि त्याने अवघ्या 18 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 50 धावा केल्या. दुसरा सलामीवीर फलंदाज आयुष महात्रे याने 11 चेंडूत 15 धावांची खेळी केली. याशिवाय हार्दिक तामोरेने 4 चेंडूत नाबाद 7 धावा करत आंगक्रिशसह विजय मिळवला. मुंबई संघाचा हा सलग दुसरा विजय आहे. तीन सामन्यांपैकी मुंबईने आतापर्यंत एक सामना गमावला आहे आणि 2 सामने जिंकले आहेत.