लोकप्रिय रिऍलिटी शो बिग बॉसच्या ओटीटीच्या तिसऱ्या पर्वाची घोषणा झाली असून लवकरच हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या पर्वात अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळतील. मुख्य म्हणजे या सिजनचे होस्टिंग बॉलीवूड अभिनेता अनिल कपूर करणार आहे. त्यामुळेच आता बिग बॉसच्या फॅन्समध्ये या सिजनची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यातच आता प्रत्येक सीजननुसार या सिजनमध्ये नक्की कोणकोणत्या कलाकारांची एन्ट्री होणार याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगत आहे.
दरम्यान दिल्लीची व्हायरल वडा पाव गर्ल चंद्रिका दीक्षित या सिजनमध्ये एन्ट्री घेणार असल्याची बातमी समोर येत आहे. शोच्या निर्मात्यांनी मिळणार असल्याचं म्हटलं जातं आहे. त्यातच चंद्रिका दीक्षित नुकतीच मुंबई विमानतळावर दिसली त्यामुळे बिग बॉसमध्ये तिच्या एंट्रीच्या चर्चा आणखीन ठळक होताना दिसत आहेत. मात्र आता वडापाव गर्लसह आणखीन एक प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर या शो मध्ये एन्ट्री घेणार असल्याची बातमी समोर येत आहे.
ती प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर म्हणजे अंजली अरोरा. ‘द फ्री प्रेस जर्नल’च्या वृत्तानुसार, अंजली अरोरादेखील बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वात सामिल होणार आहे. अंजली सर्वप्रथम कंगना रणौत यांच्या ‘लॉक अप’ शोमध्ये झळकली होती. यामधील तिची आणि मुनव्वर फारुकीची जोडी पाहायला मिळाली होती. इतकेच नव्हे तर त्यावेळी दोघांच्या अफेरच्या चर्चाही रंगल्या होत्या. दरम्यान अंजली लवकरच मोठ्या पदड्यावर झळकणार आहे. ‘आगामी चित्रपट श्री रामायण कथा’ मध्ये तिला सीतेचा रोल देण्यात आला आहे. याबद्दल अंजलीने स्वतः जाहीर केलं होत.
दरम्यान आता बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या पर्वाची सुरुवात 21 जूनपासून सुरु होणार आहे. हा सीजन बाकी सिजन्सप्रमाणेच जिओ सिनेमावर रात्री 9 वाजता पाहता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, मागील दोन सिजन्स प्रेक्षनकांना फ्रीमध्ये पाहता येत होती मात्र आता तिसऱ्या सिजनसाठी प्रेक्षकांना पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळेच आता या सिजनला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.