पिवळ्या दातांवरील सोपे घरगुती उपाय (फोटो सौजन्य - iStock)
कोणालाही एक हास्य दिलं की अगदी दिवसाची सुरूवात सुंदर होते आणि हेच हास्य ही तुमची ओळख आहे. तुमच्या दातांचा रंग तुमच्या सौंदर्यावर आणि आत्मविश्वासावर मोठ्या प्रमाणात परिणाम करतो. पांढरे दात तुमच्या हास्यामध्ये अधिकच भर घालतात, तर पिवळे दात केवळ दिसण्याच्या दृष्टीनेच नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीनेही चिंतेचे कारण असू शकतात. दात पिवळे होण्याची अनेक कारणे आहेत.
नियमितपणे ब्रश आणि फ्लॉस न केल्याने दातांवर प्लेक आणि टार्टर जमा होतात. हा थर हळूहळू दात पिवळे करतो. चहा, कॉफी, कोला, रेड वाईन सारख्या पेयांमुळे दातांवर डाग पडतात. धूम्रपान आणि तंबाखूचे सेवन केल्याने दात पिवळे किंवा तपकिरी होतात. पण मग यावर नक्की उपाय काय आहेत जेणेकरून आपले दात पुन्हा सफेद होऊन चमकतील?
पिवळ्या दातांचे अनेक तोटे आहेत. त्यामुळे केवळ आत्मविश्वास कमी होत नाही तर हिरड्यांचे आजार, दातांची पोकळी, तोंडाची दुर्गंधी आणि दात किडण्याचा धोका यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. म्हणूनच योग्य वेळी पिवळे दात पांढरे करणे महत्वाचे आहे. दंतवैद्य डॉ. जानू शाह यांनी दात पांढरे करण्याचे घरगुती उपाय सांगितले आहेत, तुम्ही आजच याची नोंद घ्या (फोटो सौजन्य – iStock)
माऊथवॉशचा वापर
माऊथवॉशचा वापर कसा करावा
हायड्रोजन पेरोक्साईड असलेले माउथवॉश वापरल्याने दातांवर जमा झालेले प्लाक निघून जाते आणि दात पांढरे दिसतात. तोंडाची दुर्गंधीदेखील दूर होते. तुम्ही केवळ दात घासून त्यावर समाधानी राहत असाल तर तसं करू नका. दातांसाठी तुम्ही नियमित हायड्रोजन पॅरॉक्साईडयुक्त माऊथवॉशचा वापर करावा. जेणेकरून दातांवर पिवळे थर जमा होणार नाहीत
रोज ब्रश करूनही दातांवर साचतोय पिवळा थर? कारण आणि सोपे घरगुती उपाय
इलेक्ट्रॉनिक टूथब्रशचा वापर
इलेक्ट्रॉनिक टूथब्रशचा योग्य वापर
इलेक्ट्रॉनिक टूथब्रशचा जर नियमित वापर केला तर ते दातांचा रंग एका रंगात हलका आणि उजळ करू शकतात. इलेक्ट्रॉनिक टूथब्रश नियमित ब्रशपेक्षा पिवळ्या रंगाचा थर अधिक प्रभावीपणे साफ करतात. तुम्ही ते योग्य तंत्राने वापरावे. याचा वापर कसा करावा कळत नसेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याचा वापर करा
बेकिंग सोडा आणि स्ट्रॉबेरी
स्ट्रॉबेरीसह बेकिंग सोडा
स्ट्रॉबेरीमध्ये सौम्य आम्ल असते आणि बेकिंग सोड्यात अल्कधर्मी कण असतात, जे दात थोडे पांढरे करू शकतात. त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा दातांचा पिवळेपणा घालविण्यासाठी उपाय करू शकता, पण ते जास्त वेळा वापरू नका. या उपायाबद्दल कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत, त्यामुळे ते वापरण्यापूर्वी हवं असल्यास आपल्या डॉक्टरांशी एकदा सल्लामसलत करा
ऑईल पुलिंग
दातांसाठी ऑईल पुलिंग
हा एक जुना घरगुती उपाय आहे ज्यामध्ये तेल (विशेषतः नारळाचे तेल) तोंडात काही मिनिटे ठेवले जाते आणि चूळ भरून ते थुंकले जाते. यामुळे दातांवरील पिवळा थर निघून जातो. याशिवाय, कॉफी, कोला इत्यादी दातांना डाग देणारे पेय कमी प्रमाणात सेवन करा जर पिणारच असाल तर तर स्ट्रॉ चा वापर करा आणि पिऊन झाल्यानंतर आपले तोंड स्वच्छ धुवा. रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करायला विसरू नका
या सर्व उपायांपूर्वी, तुमचे दात व्यावसायिकरित्या स्वच्छ/स्केलिंग करून घेणे चांगले. फक्त दंतवैद्यच दातांवर साचलेले टार्टर काढू शकतो. तरच वरील उपायांचा खरा परिणाम दिसून येईल हे लक्षात ठेवा.
दातांवरील पिवळ्या थरामुळे हसणं होतंय कठीण? सोपा घरगुती उपाय चमकवेल दात हिऱ्यासारखे
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.