(फोटो सौजन्य: istock)
हाडं हे आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहेत. त्यामुळे त्यांची देखभाल करणे ही आपली जबाबदारी आहे. शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच हाडांनाही योग्य पोषणाची गरज असते. हाडांनाही विविध आजार होऊ शकतात, म्हणूनच त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. आपण सर्वजण जाणतो की कॅन्सर ही एक गंभीर आणि जीवघेणी आजार आहे.
भात खाण्याची ‘ही’ पद्धत सडवेल आतडे, 90% लोक चुकतातच; तयार होताच 1 तासात का खावा Rice
ज्याप्रमाणे शरीराच्या इतर भागांमध्ये कॅन्सर होऊ शकतो, त्याचप्रमाणे हाडांनाही तो ग्रासू शकतो. जेव्हा कॅन्सर हाडांवर परिणाम करतो, तेव्हा त्याला “हाडांचा कॅन्सर” (Bone Cancer) असे म्हटले जाते. हा आजार शरीरातील कुठल्याही हाडात होऊ शकतो. जर याचे निदान सुरुवातीच्या टप्प्यावर झाले, तर वेळेत उपचार करणे शक्य असते. याचे उपचार केमोथेरपी, रेडिएशन थेरपी आणि शस्त्रक्रियेच्या माध्यमातून केले जातात.
कोणताही आजार होण्याआधी आपले शरीर काही संकेत देते. त्याचप्रमाणे, हाडांच्या कॅन्सरमध्येही काही लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे दुर्लक्षित केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. अनेकदा लोक ही लक्षणे केवळ थकवा किंवा सामान्य वेदना समजून दुर्लक्ष करतात, आणि हीच मोठी चूक ठरते. आज आपण हाडांच्या कॅन्सरची लक्षणे कोणती आहेत हे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
हाडांमध्ये सतत वेदना होणे
हाडांमध्ये होणाऱ्या वेदनांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. पण जर हा त्रास सतत होत असेल, तर तो हाडांच्या कॅन्सरचा प्राथमिक संकेत असू शकतो. अशावेळी त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हाडांच्या आसपास सूज येणे
जर शरीराच्या कोणत्याही भागातील हाडाजवळ सूज किंवा गाठ जाणवत असेल, तर ती देखील कॅन्सरची शक्यता दर्शवते. हा फुगवटा त्या ठिकाणी होतो जिथे कॅन्सर पेशी वाढत असतात. यामुळे तीव्र वेदनाही होऊ शकतात.
हाडांमधून आवाज येणे
कॅन्सरमुळे हाडे कमकुवत होतात. त्यामुळे शरीराला नेहमी थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. याचा परिणाम म्हणून टाच, गुडघा, हिप्स किंवा कोपराच्या हाडांतून चिरचिराट किंवा खसखस आवाज येऊ शकतो.
हाडांमध्ये अडकून जाणे
सामान्यतः हाडांची अडचण किंवा अडकणे आपण सहज दुर्लक्षित करतो. मात्र, हे देखील हाडांच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते. याकडे वेळेवर लक्ष न दिल्यास चालणे, हालचाल करणे कठीण होऊ शकते. वरील लक्षणे आढळून आल्यास त्यावर वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. वेळेत निदान आणि उपचार केल्यास हाडांच्या कँसरवर नियंत्रण मिळवता येऊ शकते.