कपाळावर पडलेले टक्कल कमी करण्यासाठी ५ रुपयांचा कढीपत्ता ठरेल प्रभावी! जाणून घ्या हेअर टॉनिक बनवण्याची सोपी कृती
आवळ्याचा तेल, डोक्यावर अशी जादू करेल! केसं वाढतील आणि घट्ट होतील
केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी कायमच वेगवेगळे उपाय केले जातात. पण यामुळे काही काळापुरतेच केस अतिशय सुंदर आणि चमकदार दिसतात. मात्र कालांतराने पुन्हा एकदा केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते. केसांची नैसर्गिक चमक कायम टिकवून ठेवण्यासाठी कढीपत्त्याच्या पानांचा वापर करावा. कढीपत्ता केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे. केस गळून केसांमध्ये पडलेले टक्कल कमी करण्यासाठी नियमित सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कढीपत्त्याच्या पानांचे सेवन करावे. यामुळे केस मजबूत आणि निरोगी राहतात. केसांसंबधित कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कढीपत्त्याच्या पानांचा वापर करून हेल्दी ड्रिंक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या ड्रिंकचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील.
केसांना मुळांपासून मजबूत करण्यासाठी घरगुती पदार्थांचे सेवन करावे. केसांना वरून पोषण देण्याऐवजी आतून पोषण द्यावे. यामुळे केस अधिक मजबूत होतात आणि केसांची गुणवत्ता सुधारते. यासाठी कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर पाने व्यवस्थित पुसून कोरडी करा. कढईमध्ये ऑलिव्ह ऑईल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात कढीपत्त्याची पाने घालून कुरकुरीत होईपर्यंत भाजा. त्यानंतर भाजून घेतलेली पाने थंड करून मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक पावडर तयार करा. तयार केलेली पावडर कोमट पाण्यात मिक्स करून उपाशी पोटी प्यावी. यामुळे केस मजबूत होतील आणि केसांची गुणवत्ता सुधारेल.
कढीपत्ता शरीरासाठी अतिशय प्रभावी ठरतो. सकाळी उठल्यानंतर नियमित कोमट पाण्यात कढीपत्त्याची पावडर मिक्स करून प्यायल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जाते. कढीपत्त्याच्या पानांमध्ये विटामिन ए,बी, सी आणि ई, के यांसह आयर्न, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडेंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. यामुळे शरीराचे रक्तभिसरण सुधारते आणि केसांची वाढ होते.






