सुपरफूड्सचा करा आहारात समावेश
ज्या व्यक्तींना सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत ऑफिसमध्ये राहावं लागतं त्यांना त्यांच्या आहाराची विशेष काळजी घेण्याची संधी मिळत नाही. ते कामात इतके व्यस्त असतात की दररोज ठरलेल्या वेळेत पौष्टिक आहार घेणे शक्य होत नाही आणि याचा परिणाम तरूण वयातच शरीरावर आणि आरोग्यावर होताना दिसून येतो.
अशा लोकांनी त्यांच्या आहारात काही सुपरफूड्सचा समावेश करावा, जेणेकरून त्यांना व्यवस्थित ताकद देतात आणि आरोग्यावर कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. चला जाणून घेऊया नोकरी करणाऱ्या लोकांसाठी असे काही सुपरफूड्स. (फोटो सौजन्य – iStock)
फायबरयुक्त मखाणा
प्रथिने आणि फायबरने समृद्ध असलेले मखाणा खाल्ल्याने तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते आणि यामुळे शरीराला अधिक ऊर्जा मिळते. यामध्ये अँटीऑक्सिडंट्सदेखील आढळतात, जे त्वचेच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. मखाणा हे कॅल्शियमचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास देखील मदत करतात.
हेदेखील वाचा – Immune Boosting Herbs: पावसाळ्यात आजारांना दूर ठेवतील 4 वनस्पती, असे करा सेवन
पौष्टिक नाचणी
तुमच्या आहारात कॅल्शियम, प्रथिने आणि लोहाने भरपूर युक्त असणाऱ्या् नाचणीचा समावेश करा. जेव्हा काही कारणास्तव तुम्ही दिवसभर पुरेसे दूध पीत नाही किंवा ड्रायफ्रुट्स किंवा नट्स खात नाही, तेव्हा मधुमेह नियंत्रित करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी नाचणी हा एक उत्तम पर्याय आहे. नाचणी पचायलाही सोपी आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या टिफिनमध्ये नाचणीचा डोसा, इडली किंवा नाचणीपासून बनवलेले इतर पदार्थ घेऊन ऑफिसला जाऊ शकता. तसंच दुपारी नाचणीची भाकरी आणि पालेभाजी हा उत्तम आहार ठरू शकतो.
उकडलेली कडधान्ये
तुम्ही टिफिनमध्ये प्रोटीन रिच स्प्राउट्स तुम्ही नाश्त्यासाठी वेगळे घेऊ शकता. कडधान्यांची कोशिंबीर किंवा स्प्राउट भेळ हा एक उत्तम पर्याय आहे. जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हा हे खाणे आरोग्यासाठी उत्तम ठरते. तसंच तुम्हाला बराच काळ पोट भरल्यासारखे वाटते. हरभरा, मूग आणि सोयाबीन सोबतच सूर्यफुलाच्या बिया, गाजर, लिंबू, ब्लूबेरी असे इतर सुपरफूड टाकून स्प्राउट्स अधिक पौष्टिक बनवता येतात.
चिया सीड्सचा वापर
हे एक उत्कृष्ट वनस्पती-आधारित प्रोटीन आहे, जे अमीनो अॅसिड, प्रथिने, ओमेगा थ्री फॅटी अॅसिडसारख्या आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. चिया सीड्सचा वापर तुम्ही कोणत्याही स्मूदी, शेक, ज्यूस किंवा कोणत्याही एनर्जी ड्रिंकमध्ये घालून करू शकता विशेषत: नारळाच्या पाण्यासोबत चिया सीड्सचा वापर हा अधिक उत्तम ठरतो.
चण्याचे सत्तू
प्रथिने, फायबर आणि खनिजे समृद्ध असणारे चना सत्तू हे शरीरातील उष्णता कमी करून शरीत थंड ठेवण्यासाठी पॉवरहाऊस समजले जाते. यामुळे झटपट ऊर्जा मिळते आणि जास्त वेळ भूक लागत नाही. तसंच पोटात जळजळ, गॅस होत असतील तर त्यापासून लवकर सुटका मिळण्यास याचा उपयोग होतो. तुम्ही ऑफिसमध्ये याचे पदार्थ नेऊन खाऊ शकता.
संदर्भ
https://www.everydayhealth.com/photogallery/superfoods.aspx
https://smashyourtodolist.com/superfoods-boost-productivity/
https://retailio.in/5-Superfoods.html