धक्कादायक ! सीआरपीएफ जवानाचा विवाहितेवर अत्याचार; चार लाखही उकळले, 'ते' फोटो-व्हिडिओ व्हायरल करतो म्हटला अन्... (File Photo : Crime)
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यातच महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना आता सुट्टीच्या नावाने कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने एका महिला कर्मचाऱ्याला ‘तू खूप सुंदर आहेस, मला आवडतेस, मला खुश कर, दोन दिवस काय दहा दिवस सुट्या देईन आणि पगारही कापणार नाही’, असे म्हणत लैंगिक शोषण केल्याची घटना बांभोरीतील अॅस्टोमो कंपनीत घडली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून जनार्दन नामक अधिकाऱ्यावर धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आजारी मुलीच्या शुश्रुषेसाठी सुटी मागितली असता हा प्रकार झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. आरोपी अधिकारी फरार असून, पोलिस आरोपीचा शोध घेत असल्याचे पोलीस अंमलदार अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले.
मारहाण, जमिनीवर पाडून अश्लील चाळे
या कृत्याचा प्रतिकार केला तेव्हा अधिकाऱ्याने पीडित महिलेच्या कानशिलात लगावली. पीडितेला जमिनीवर पाडून तिच्याशी अश्लील चाळे केले. गुंड आणि राजकारणी माझ्या ओळखीचे आहेत. तू कोणाला काही सांगितले, तर तुझ्यासह कुटुंबाला संपवून टाकीन, अशी धमकीही त्याने पीडितेला दिली. घटनेचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेला गप्प करण्याचा प्रयत्न केला.
52 वर्षीय नराधमाचा चिमुरडीवर अत्याचार
दुसऱ्या एका घटनेत, बारामती शहरातील अनंतआशा नगर परिसरात राहणाऱ्या एका 52 वर्षीय नराधमाने ओळखीचा गैरफायदा घेत 10 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. हसन शमशुद्दीन झारे उर्फ राजू (वय ५२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो पीडित बालिकेच्या शेजारीच राहत असून, पीडितेच्या कुटुंबाशी त्याची जुनी ओळख होती. याच ओळखीचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्या घरी नेले. घरात कोणीही नसताना त्याने मुलीवर अत्याचार केला. यानंतर ही बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती.






