लिव्हर डिटॉक्सिफिकेशन फूड
शरीराची कार्यप्रणाली सुरळीत ठेवण्यासाठी लिव्हर अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. लिव्हर अनेक पाचक रस तयार करते, ज्याचा प्रभाव पचनसंस्थेपासून शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यात दिसून येतो. लिव्हरमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास शरीराची संपूर्ण यंत्रणा विस्कळीत होऊ शकते.
चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे अनेक विषारी घटक आपल्या लिव्हरमध्ये जमा होतात ज्यामुळे हानी पोहचू शकते. हे टाळण्यासाठी लिव्हरचे डिटॉक्सिफिकेशन करणे अत्यंत आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल सांगत आहोत, ज्यांच्या सेवनाने लिव्हरमध्ये साचलेली घाण साफ होऊ शकते. याबाबत डाएट मंत्रा क्लिनिक, नोएडाच्या संस्थापक आणि वरीष्ठ आहारतज्ज्ञ कामिनी सिन्हा यांनी अधिक माहिती एका हिंदी संकेतस्थळाला दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock)
लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी काय करावे
लिंबाचा वापर
लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी लिंबाचा वापर
लिंबू व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. हे लिव्हरमधील विषारी घटक काढून टाकण्यास मदत करते आणि लिव्हर निरोगी ठेवण्यास मदत करते. सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिणे लिव्हर डिटॉक्सिफिकेशनसाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
हेदेखील वाचा – Liver च्या आरोग्यासाठी 5 उत्कृष्ट पदार्थ कोणते? डाएटिशियनने दिली यादी
ग्रीन टी
लिव्हरमधील घाण काढण्यासाठी ग्रीन टी
ग्रीन टीमध्ये कॅटेचिन नावाचे अँटीऑक्सिडंट असतात, जे यकृताचे कार्य सुधारतात आणि विषारी घटक काढून टाकतात. ग्रीन टी चे नियमित सेवन लिव्हरसाठी फायदेशीर आहे. तुम्ही दिवसातून दोन वेळा ग्रीन टी चे सेवन करू शकता. ग्रीन टी मध्ये असणारे हर्ब्स हे आपल्या शरीरासाठी उत्तम ठरतात
गाजर आणि बीट
गाजर आणि बिटाचा वापर करून लिव्हर डिटॉक्सिफिकेशन
गाजर आणि बीटरूटचे सेवन केल्याने लिव्हरचे आरोग्यदेखील सुधारते. बीटरूटमध्ये बेटेन नावाचा घटक असतो, जो यकृताच्या पेशींची दुरुस्ती करतो आणि विषारी पदार्थ काढून टाकतो. गाजरमध्ये बीटा-कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट असतात जे लिव्हरचे कार्य वाढविण्यास मदत करतात.
हेदेखील वाचा – कोल्ड ड्रिंक्स का ठरतात फॅटी लिव्हरला कारणीभूत? जाणून घ्या
आल्याचा आणि हळदीचा उपयोग
लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी हळद आणि आल्याचा वापर
आल्यामध्ये जिंजरॉल आणि शोगोल सारखे सक्रिय घटक असतात, जे पचन सुधारतात आणि लिव्हर डिटॉक्सिफाय करतात. तर हळदीमध्ये कर्क्यूमिन असते, जे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे. हे लिव्हरची जळजळ कमी करते आणि विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते.
हिरव्या पालेभाज्या
हिरव्या पालेभाज्यांचा उपयोग करून लिव्हर डिटॉक्स
लिव्हर डिटॉक्समध्ये हिरव्या पालेभाज्या फायदेशीर मानल्या जातात. पालकामध्ये क्लोरोफिल आणि अँटीऑक्सिडंट असतात, जे लिव्हर स्वच्छ करण्यास मदत करतात. याशिवाय ब्रोकोलीमध्ये सल्फोराफेन आणि व्हिटॅमिन सी असते, जे यकृताचे कार्य वाढवते आणि ते डिटॉक्सिफाय करते.