(फोटो सौजन्य: istock)
आजकाल चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे आणि व्यायामाच्या अभावामुळे अनेकजण वेगवगेळ्या आजरांनी ग्रस्त आहे. या आजरांमुळे अनेकांनी आतापर्यंत आपला जीव गमावला असून याबद्दल लोकांमध्ये सतर्कता असणे फार गरजेचे आहे. अनेकदा आपल्या आजाराचा धोका आहे हे लोकांना उमजत नाही आणि जोपर्यंत समजतं तोपर्यंत फार उशीर होऊन गेलेला असतो. मागील काही काळापासून हार्ट फेलरचा धोकाही प्रचंड वाढला आहे. आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अंग म्हणजे आपले हृदय आहे अशात आपल्या हृदयाची काळजी ही आपल्या हातात आहे. तुमची एक चूक आणि तुमचा मृत्यू तुम्हाला भेटायला येऊ शकतो. अशात आज आम्ही तुम्हला हार्ट फेलरच्या आधी शरीरात दिसून येणाऱ्या काही लक्षणांविषयीची माहिती सांगणार आहोत ज्यांना ओळखताच तुम्ही मृत्यूचा धोका टाळू शकता आणि स्वतःला सुरक्षित करू शकता. चला हार्ट फेलरची काही प्रमुख लक्षणे सविस्तरपणे जाणून घेऊया.
मेकअप करण्याआधी Malaika Arora फॉलो करते ‘या’ गोष्टी, जाणून घ्या मालयकाचे स्किन केअर रुटीन
श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो
हार्ट फेलरचा धोका असल्यास अचानक थोडे चालताना किंवा पायऱ्या चढताना श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. यामुळे झोपतानाही श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो आणि आपली झोप भंग होऊ शकते.
थकवा आणि अशक्तपणा
हृदयाच्या कमकुवतपणामुळे शरीराला आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही, ज्यामुळे शरीरात थकवा जाणवू लागतो. अनावश्यक थकवा जाणवत असल्यास त्वरित यावर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
पाय, घोटे आणि पोटात सूज येणे (एडेमा)
जेव्हा हृदय योग्यरित्या कार्य करत नाही तेव्हा शरीरात द्रव जमा होऊ लागतो, ज्यामुळे पाय आणि पोटात सूज निर्माण होऊ शकते. सामान्य वाटणारे हे लक्षण हार्ट फेलरचा इशारा देत असते त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि यावर तज्ज्ञांचा योग्य तो सल्ला घ्या.
अनियमित किंवा जलद हृदयाचे ठोके
हृदयावर प्रेशर वाढले की अचानक हृदयाचे ठोके जलद आणि अनियमित होऊ लागतात. हे तुमच्या हार्टसाठी चांगले नाही.
भूक न लागणे किंवा मळमळ होणे
पचनसंस्थेतील रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे भूक न लागण्याची समस्या उद्भवू शकते. पुन्हा पुन्हा असं होत असेल तर हॉस्पिटल गाठत यावर योग्य तो सल्ला घ्या.
वजन वाढणे किंवा कमी होणे
शरीरात पाणी साचून राहिल्याने अचानक वजन वाढू शकते. त्याच वेळी, पचनसंस्थेला योग्य रक्तपुरवठा न झाल्यामुळे, पोषक तत्वे शोषली जात नाहीत, ज्यामुळे वजन झपाट्याने वाढते किंवा कमी होऊ लागते.
निरोगी आहार घ्या
आपण जे काही खातो त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. आजकाल अनेकांचे बाहेरील प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याचे प्रमाण फार वाढले आहे ज्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवतात. निरोगी आहार घेऊन तुम्ही अनेक आजारांना आपल्यापासून दूर लोटू शकता. यासाठी आहारात मिठाचे प्रमाण कमी करा, फळे खा आणि आहारात हिरव्या भाज्यांचा तसेच कडधान्याचा समावेश करा.
नियमित व्यायाम करा
व्यायाम आपल्या शरीरासाठी फार फायद्याचा असतो. यामुळे आपले शरीर तंदुरुस्त आणि बळकट बनते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चालणे, योगा किंवा सायकलिंगसारखे हलके व्यायाम करा. यामुळे हृदयाचे स्नायू मजबूत होतात आणि रक्तप्रवाह सुधारतो .
तुमचे वजन नियंत्रित करा
लठ्ठपणा अनेक आजरांना खुले आमंत्रण देत असतो . निरोगी जीवनासाठी आपले वजन नियंत्रणात असणे फार गरजेचे आहे. यामुळे हृदयरोगाचा धोकाही वाढतो अशात योग्य डाएट प्लॅन फॉलो करून तुमचे वजन नियंत्रणात ठेवा.
धूम्रपान आणि मद्यपान टाळा
धूम्रपान आणि जास्त मद्यपान आपल्या आरोग्यासाठी किती धोकादायक आहे हे सर्वांना ठाऊक आहे. याचे नियमित सेवन हृदयाच्या धमन्यांचे नुकसान करत असते.
ताण कमी करा
ताण हृदयासाठी हानिकारक आहे. ध्यान करा, दीर्घ श्वास घेण्याचे व्यायाम करा आणि योग्य झोप घेऊन आपला ताण कमी करण्याचा प्रयत्न करा.
नियमित तपासणी करा
हाय ब्लड प्रेशर, मधुमेह आणि कोलेस्टेरॉलची तपासणी करत रहा, कारण ही हृदयविकाराची प्रमुख कारणे आहेत. आपण अनेकदा लहान सहान गोष्टींसाठी डॉक्टर कशाला असे म्हणतो आणि यातूनच आजार हळूहळू मोठे होऊ लागतात. वेळीच तपासणी केल्यास आजारांचा धोका टाळता येऊ शकतो.
वेळेवर औषधे घ्या
जर तुम्हाला हृदयाशी संबंधित काही समस्या असतील तर डॉक्टरांनी सांगितलेली औषधे वेळेवर घेत जा आणि यांची वेळ चुकवू नका.
हार्ट फेलर काय आहे?
शी स्थिती आहे जिथे हृदय शरीराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे रक्त पंप करू शकत नाही.
तुम्ही डॉक्टरांना कोणते प्रश्न विचारावेत?
मला कोणत्या प्रकारचा हृदयविकार आहे, उपचार पर्याय काय आहेत, माझी प्रकृती आणखी बिघडत आहे हे मला कसे कळेल, माझ्यासाठी जीवनशैलीतील सर्वोत्तम बदल कोणते आहेत.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.