वयाच्या चाळीशीत चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो! रोजच्या आहारात नियमित करा 'या' पौष्टिक पदार्थांचे सेवन
वय वाढल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल दिसून येतात. या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. कारण वयाच्या चाळिशीनंतर मासिक पाळीच्या समस्या, त्वचेवर आलेले सुकूत्या, बारीक रेषा, वांग, हाडांमध्ये वाढलेल्या वेदना,अचानक शरीरात वाढलेल्या वेदना इत्यादी अनेक समस्यांमुळे महिला मानसिक तणावात जातात. पण शरीरात दिसून येणाऱ्या बदलांकडे लक्ष देऊन शरीराची योग्य काळजी घेतल्यास तुम्ही कायमच तरुण राहाल. चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी फेसवॉश लावून त्वचा स्वच्छ केली जाते तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो. वारंवार चुकीचे स्किन केअर आणि ट्रीटमेंट घेतल्यामुळे त्वचा खूप जास्त निस्तेज होऊन जाते. (फोटो सौजन्य – istock)
हिवाळ्यात चेहऱ्याला वाचवा! ‘हा’ फेस पॅक ठरेल फायदेशीर, आजपासूनच सुरु करा
लाईफस्टाईल, प्रदूषणा आणि तणावामुळे चेहऱ्यावर एजिंगच्या खुणा खूप लवकर दिसू लागतात. या खुणा लपवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात, मात्र तरीसुद्धा त्वचेवर आलेल्या सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होत नाही. त्वचेची काळजी घेण्यासाठी कायमच त्वचेला वरून पोषण देण्याऐवजी आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्वचा कायमच तरुण आणि टवटवीत राहण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे त्वचेवर चमकदार ग्लो येईल आणि चेहरा कायमच तरुण दिसेल.
त्वचा कायमच सुंदर आणि तरुण ठेवण्यासाठी शरीरात कोलेजन, विटामिन सी आणि इतर आवश्यक घटकांची योग्य पातळी असणे फार गरजेचे आहे. शरीराला अन्नपदार्थांमध्ये मिळणाऱ्या कोलेजनमुळे त्वचा कायमच हायड्रेट राहते आणि सुंदर राहते. यामुळे त्वचेमधील ओलावा कमी होत नाही. फ्री रॅडिकल्समुळे त्वचेचे होणारे नुकसान टाळण्यासाठी कोलेजन असलेल्या पदार्थांचे आहारात नेहमीच सेवन करावे.
संत्री, टोमॅटो, पेरू आणि ढोबळी मिरची, आंबट फळे, सुका मेवा इत्यादी पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आणि इतर आवश्यक घटक आढळून येतात. विटामिन सी असलेल्या पदार्थांचे रोजच्या आहारात सेवन केल्यामुळे शरीरात कोलेजनची निर्मिती झपाट्याने होण्यास मदत होते. याशिवाय शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
दिवसभरात २ ते ३ लिटर पाण्याचे सेवन केल्यास त्वचा कायमच हायड्रेट राहील. याशिवाय त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहण्यासाठी पाण्यासोबत फळांचा रस, डिटॉक्स ड्रिंक आणि शरीरास आवश्यक असलेल्या पेयांचे सेवन करणे आवश्यक आहे. दैनंदिन आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर दिसून येतो. त्यामुळे आहारात कमीत कमी तेलकट आणि तिखट पदार्थांचे सेवन करावे.
बेरीज, पालक, डाळिंब, आणि द्राक्षे, बदाम, सूर्यफूलाच्या बिया, पालक आणि एवोकॅडो इत्यादी अँटी – ऑक्सिडंट्सयुक्त पदार्थांच्या सेवनामुळे त्वचेवर ग्लो कायम टिकून राहतो. काहींना सतत जंक फूडचे सेवन करण्याची सवय असते. पण वारंवार जंक फूडच्या सेवनामुळे आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू लागतात. विटामिन ई असलेल्या पदार्थांचे आहारात सेवन केल्यामुळे त्वचेला भरपूर पोषण मिळते.
डाळी, चणे, शेंगा, आणि ब्राऊन राईस इत्यादी पदार्थांमध्ये झिंक आणि सेलेनियमयुक्त घटक आढळून येतात, ज्यामुळे शरीरात कोलेजन तयार होते. त्वचेसाठी कोलेजन अतिशय महत्वाचे आहे. टोफू, पालक आणि तुळस इत्यादी पदार्थांमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात, ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि चेहऱ्यावर आलेली सूज कमी होते.






