फोटो सौजन्य: iStock
जेव्हा जेव्हा प्रोटीनयुक्त अन्नाचा विचार केला जातो तेव्हा अंडी सर्वोत्तम मानले जाते. हे तुम्ही नाश्त्यात, दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात कधीही खाऊ शकता. अंडी आहारासाठी आवश्यक मानली जातात. असे म्हटले जाते की दररोज फक्त एक अंडे खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की अंडी खाल्ल्याने देखील कॅन्सर होऊ शकतो. हे वाचून नक्कीच अनेकांना धक्का बसला असेल.
नुकतेच एका अहवालात एक धक्कादायक खुलासा झाला आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की आठवड्यातून काही अंडी खाल्ल्याने कॅन्सरचा धोका 19% वाढू शकतो. चला या संशोधनाबद्दल जाणून घेऊयात.
एका माहितीनुसार, अंडी खाण्यासाठी ते कसे शिजवले जातात यावरून त्याचे दुष्परिणाम ठरतात. या अहवालात असे म्हटले आहे की अंडी उच्च तापमानात तळताना तयार होणाऱ्या कर्करोगजन्य रसायनांचा स्रोत असू शकतात. या अभ्यासात असेही म्हटले आहे की आठवड्यातून फक्त काही अंडी खाल्ल्याने कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका 19 टक्क्याने वाढू शकतो, परंतु जर तुम्ही आठवड्यातून तीन किंवा त्याहून अधिक अंडी खाल्ली तर हा धोका 71 टक्क्यांनी वाढू शकतो.
काही सोर्सेसच्या माहितीनुसार, अंड्यांमध्ये कोलीनचे प्रमाण जास्त असते आणि हे कोलीन आतड्यातील बॅक्टेरियाच्या संपर्कात आल्यावर ट्रायमेथिलामाइन (TMA) मध्ये रूपांतरित होते, जे आपल्या यकृताद्वारे ट्रायमेथिलामाइन-एन-ऑक्साइड (TMAO) मध्ये ऑक्सिडायझेशन केले जाते, जे पुढे जळजळ वाढवते आणि कॅन्सरच्या वाढीस प्रोत्साहन देते. असे म्हटले जाते की TMAO चा लेव्हल जळजळ, ऑक्सिडेटिव्ह ताण आणि ट्यूमर वाढवू शकते, ज्यामुळे कॅन्सरचा धोका उद्भवतो. विशेषतः कोलन आणि लिव्हर कॅन्सरमध्ये.
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने केलेल्या आणखी एका अभ्यासात असेही म्हटले आहे की अंडी कॅन्सरला कारणीभूत ठरतात. ‘Egg Consumption and the Risk of Cancer: a Multisite Case-Control Study in Uruguay’ या नावाच्या अभ्यासात 1996 ते 2004 दरम्यान उरुग्वेमधील 11 कॅन्सर साइट्सचा केस-कंट्रोल अभ्यास करण्यात आला, ज्यामध्ये 3,539 कॅन्सरच्या घटना आणि 2,032 रुग्णालयांच्या तपासणीचा समावेश होता. यात जास्त अंड्याचे सेवन आणि अनेक कॅन्सरच्या वाढीव जोखमीमध्ये संबंध आढळला आहे.
वारंवार अॅसिडिटीमुळे छातीत जळजळ होते? मग ‘हे’ आयुर्वेदिक उपाय करून मिळवा आराम, Acidity होईल कमी
तज्ञांचे म्हणणे आहे की इतर कोणत्याही अन्नाप्रमाणे, अंडी देखील मर्यादेत खावीत. असे म्हटले जाते की प्रोबायोटिक्स, फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करून आणि प्रक्रिया केलेले फूड मर्यादित करून आतड्यांचे सूक्ष्मजीव संतुलित राखल्याने TMAO लेव्हल नियंत्रित करण्यास मदत होऊ शकते. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या मते, एखाद्या व्यक्तीने आठवड्यातून एक किंवा दोनपेक्षा जास्त अंडी खाऊ नयेत. याचे कारण म्हणजे अंड्यातील पिवळ्या भागामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते.