कडक उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी घरी बनवा काकडी-कलिंगड स्मुदी
उन्हाळा वाढल्यानंतर शरीराला पाण्याची जास्त आवश्यकता असते. इतर ऋतूंच्या तुलनेत उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. शरीरातील ओलावा कायम टिकवून ठेवण्यासाठी पाण्यासोबतच, लिंबू सरबत, दही, ताक इत्यादी थंड पेयांचे सेवन करावे. थंड पेयांच्या सेवनामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होते आणि शरीर थंड राहते. उन्हाळ्यात नाश्त्यामध्ये कोणत्याही तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी स्मूदी किंवा मिल्कशेकचे सेवन करावे. यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते. यासोबतच पचनक्रिया देखील निरोगी राहते. पचनसंबंधित कोणत्याही समस्या उद्भवत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काकडी कलिंगड स्मूदी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या स्मूदीचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. याशिवाय काकडी आणि कलिंगड शरीर हायड्रेट ठेवते. जाणून घ्या स्मूदी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
चमचाभर बडीशेप आणि खडीसाखरेचा वापर करून उन्हाळ्यात बनवा थंडगार सरबत, उष्णता होईल कमी
उन्हाळ्यात शरीरासाठी फायदेशीर ठरेल थंडगार बीटची कांजी! पारंपारिक पद्धतीने तयार करा पेय