Gym न करता पोटावरील चरबी होईल कायमची गायब! सकाळी उठल्यानंतर नियमित करा 'ही' कामे
जगभरात वाढलेल्या वजनाने अनेक लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. या बदलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. शरीरात वाढलेला लठ्ठपणा आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतो. यामुळे मधुमेह, कोलेस्ट्रॉल किंवा उच्च रक्तदाब वाढण्याची जास्त शक्यता असते. शरीरावर वाढलेल्या अनावश्यक चरबीमुळे काहीवेळा महिलांचा आत्मविश्वास कमी होऊन जातो. त्यामुळे वजन वाढल्यानंतर ते कमी करणे सुद्धा आवश्यक आहे. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी महिलांसह पुरुषसुद्धा तासनतास व्यायाम करतात. तर काही महिला वेगवेगळ्या सप्लिमेंटचे सेवन करतात. पण बाजारात मिळणाऱ्या केमिकल युक्त हानिकारक पेयांचे सेवन करण्याऐवजी हेल्दी आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते.(फोटो सौजन्य – istock)
वजन जितक्या वेगाने वाढते, तितक्या वेगाने ते कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक जेवण करणे टाळतात. पण वारंवार उपाशी राहिल्यामुळे वाढलेले वजन कमी होण्याऐवजी आणखीनच वाढते आणि शरीराला गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर कोणती कामे करावीत, ज्यामुळे वाढलेले वजन कमी होईल, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय करताना कोणतीही जिम किंवा महागडा डाएट घेण्याची काहीच आवश्यक नाही.
बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आरोग्यावर दिसून येत आहे. रात्रभर मोबाईल पाहत पाहून सकाळी काहींना झोपण्याची सवय असते. यामुळे संपूर्ण दिवसभराचा दिनक्रम खराब होऊन जातो. त्यामुळे रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठण्याची सवय लावावी. यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल. सकाळी लवकर उठल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य कायमच निरोगी राहील. सकाळी लवकर उठल्यामुळे नाश्ता आणि इतर कामे करण्यासाठी अधिक वेळ मिळतो. त्यामुळे घाई होत नाही.
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित एक ग्लास कोमट पाण्याचे सेवन करावे. कोमट पाण्याच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होईल आणि शरीर कायमच निरोगी राहील. कोमट पाण्याचे नियमित सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात. याशिवाय कोमट पाण्यात तुम्ही लिंबू, जिऱ्याची पावडर किंवा मध मिक्स करून सुद्धा पिऊ शकता.
‘या’ 1 व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे येऊ शकतो Heart Attack, वेळीच सावध व्हा!
दिवसभरातील ३० मिनिटं व्यायाम आणि योगासनांसाठी द्यावी. ध्यान किंवा योगासने केल्यामुळे शरीर शांत राहते. मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. याशिवाय व्यायाम केल्यामुळे पोटावर वाढलेला चरबीचा घेर हळूहळू कमी होतो. स्नायू मजबूत आणि बळकट करण्यासाठी व्यायाम किंवा योगासने करावीत.याशिवाय पौष्टिक आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे नाश्त्यात सेवन करावे.