दीर्घायुष्यासाठी कोरियन पदार्थ
प्रत्येकजण दीर्घ आयुष्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतो, परंतु कोरियन लोक दीर्घ आयुष्य का जगतात हे तुम्हाला माहिती आहे का? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे. चला तर मग आम्ही तुम्हाला सांगूया शंभर वर्षे जगण्याचे कोणते मार्ग आहेत आणि त्यासाठी काय खावे.
तुम्ही पाहिले असेलच की कोरियन लोक वाढत्या वयानंतरही निरोगी राहतात आणि त्यांचा फिटनेसही अप्रतिम आहे. यासोबतच त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या कमी पडतात आणि या व्यक्ती नेहमी तरुण दिसतात. कोरियन लोकांचे रहस्य काय आहे ज्याद्वारे ते 100 वर्षे जगतात आणि असे सिक्रेट जे तुम्हालाही फॉलो करता येईल? 100 वर्षांच्या आयुष्यासाठी अँटी-एजिंग फूड नक्की काय आहेत जाणून घ्या. याबाबत अनेक अभ्यासात देण्यात आले आहे. आपणही या लेखातून जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)
खातात खास पदार्थ
कोरियन पदार्थ
कोरियन लोकांच्या दीर्घायुष्य आणि तंदुरुस्त आयुष्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांचा आहार. कोरियन लोक एक खास प्रकारचे कोरियन टेंपल क्युझिन खातात, ज्यामुळे ते तरुण दिसतात आणि त्याच वेळी ते पूर्णपणे फिट राहतात. कोरियामध्ये टेंपल क्युझिन अधिक प्रमाणात खाल्ले जातात कारण यामुळे आरोग्याला हानी पोहचत नाही.
सनसिक फूडचा आहारात समावेश
कोरियन लोक त्यांच्या खास आहारात सनसिक नावाचा पदार्थ खातात. kccuk च्या अहवालानुसार, Sunsik हा एक प्रकारचा पारंपारिक डिश आहे, जो प्रामुख्याने दक्षिण कोरियातील बौद्ध मंदिरांमध्ये दिला जातो. याचा आरोग्याला फायदा मिळतो आणि आजारापासून दूर राहण्यास मदत मिळते. तसंच शरीर निरोगी राहते.
टेंपल क्युझिनमध्ये कशाचा समावेश
टेंपल क्युझिनमध्ये या पदार्थांचा समावेश
अहवालानुसार, कोरियन मंदिरातील खाद्यपदार्थ सनसिकमध्ये बहुतेक वनस्पतींवर आधारित घटक वापरतात. हंगामी भाज्यांव्यतिरिक्त, त्यात प्रामुख्याने धान्ये, शेंगा, जंगली वनस्पती आणि मशरूमचा समावेश आहे. या पदार्थात मांसाहार, कांदा आणि लसूण अजिबात वापरले जात नाही, ज्यामुळे शरीरामध्ये अधिक दुष्परिणाम होत नाहीत.
कसे बनते कोरियन जेवण
कोरियातील मंदिरांमध्ये तयार केलेले अन्न पाच रंगांमध्ये तयार केले जाते, ज्यात हिरवा, पिवळा, पांढरा, लाल आणि काळा यांचा समावेश आहे. या रंगांमुळे हे अन्न अधिक चविष्ट लागते आणि आरोग्यासाठी चांगले ठरते. हे अन्न कडू, गोड, आंबट, खारट आणि मसालेदार अशा पाच प्रकारच्या चवीने तयार करण्यात येते.
सनसिक बनवण्यासोबतच त्याची खाण्याची पद्धतही खास आहे. कोरियन लोक हे अन्न अगदी हळूवार पद्धतीने शिजवतात आणि खातानाही त्याचा पूर्ण आस्वाद घेत हळू खातात.
दीर्घायुष्याचे रहस्य
दीर्घायुष्यासाठी खावेत असे पदार्थ
मंदिरात तयार केलेले अन्न आरोग्यासाठी खूप चांगले असते. यामध्ये अशा गोष्टी असतात ज्यामुळे आपले आजार दूर होतात आणि शरीर आतून स्वच्छ राहते. कारण, या अन्नामध्ये फक्त ताज्या आणि हंगामी भाज्या आणि फळांचा वापर केला जातो, त्यामुळे ते दीर्घायुष्यासाठी निरोगी राहते. कोणताही आजार तुमच्या आजूबाजूला फिरकत नाही.
कसे मिळेल 100 वर्ष आयुष्य
कोरियाच्या लोकांप्रमाणे दीर्घायुष्यासाठी तुम्हीही तुमच्या आहारात अशा ताज्या भाज्या, फळे, संपूर्ण धान्य आणि कडधान्ये यांचा समावेश करा, ज्यामुळे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स मिळतात. यासोबतच अन्न घाईघाईने खाण्याऐवजी हळूहळू खा, चावून चावून खा. या सगळ्याचा आरोग्य निरोगी राखण्यासाठी फायदा मिळतो.
संदर्भ
https://www.koreatimes.co.kr/www/opinion/2024/07/137_374214.html