तुमची त्वचा कशी राहील तरूण (फोटो सौजन्य - iStock)
वाढत्या वयानुसार, चेहऱ्यावरील चमक कमी होणे, सुरकुत्या पडणे आणि त्वचेची चमक कमी होणे या सामान्य समस्या आहेत. विशेषतः वयाच्या ४० व्या वर्षानंतर, त्वचेची नैसर्गिक लवचिकता कमी होऊ लागते, ज्यामुळे बारीक रेषा आणि वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागतात. पण जर तुम्हाला तुमची त्वचा किशोरवयीन मुलांसारखी तरुण आणि चमकदार राहावी असे वाटत असेल, तर कोरियन ब्युटी सिक्रेट्स तुम्हाला मदत करू शकतात.
कोरियन महिला त्यांच्या डागविरहीत आणि चमकदार त्वचेसाठी जगभर प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या सौंदर्याचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे कोरियन चहा. हा हर्बल चहा केवळ शरीराला डिटॉक्स करत नाही तर त्वचेची सखोल काळजी घेऊन सुरकुत्या देखील कमी करतो. चला तर मग जाणून घेऊया त्या ५ खास कोरियन चहांबद्दल, जे ४० नंतरही तुमची त्वचा तरुण आणि ताजी ठेवण्यास मदत करू शकतात.
जिनसेंग टी
जिनसेंग टी मुळे त्वचा राहील उत्तम
कोरियन जिनसेंग चहा ऊर्जा आणि मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी ओळखला जातो. ‘जर्नल ऑफ जिनसेंग रिसर्च’ मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, जिनसेंग चहा एक अॅडॉप्टोजेन म्हणून काम करते, जे तणावाशी लढण्यास मदत करते. याचे नियमित सेवन केल्याने शरीराचा थकवा दूर होतो आणि त्वचा घट्ट राहते अर्थात त्वचेची कसावट चांगली राहून चेहऱ्यावर वय दिसून येत नाही आणि तुम्ही अधिक सुंदर आणि तरूण दिसता
टॅनिंगमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग ‘या’ फळाचा फेसपॅक नक्की करा ट्राय, त्वचा होईल गोरीपान
सिट्रन टी
सिट्रन चहा करेल कमाल
कोरियामध्ये लिंबूवर्गीय चहाला युजा-चा (Yuja-Cha) असेही म्हणतात, ज्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते. इंटरनॅशनल जर्नल ऑफ मॉलिक्युलर सायन्सेसमधील एका अहवालानुसार, हा चहा रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतो आणि सर्दी, खोकला आणि घसा खवखवण्यापासून आराम देतो. याच्या नियमित वापराने त्वचेचा रंग सुधारतो आणि काचेसारखी चमक येते. यामुळेच कोरियन मुलींची त्वचा अधिक चमकदार आणि आकर्षक दिसते
जिंजर टी अर्थात आल्याचा चहा
आल्याचा चहा ठरेल उपयुक्त
आल्यापासून बनवलेला हा चहा त्याच्या अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. इंटरनॅशनल जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेडिसिननुसार, आल्याचा चहा शरीरातील जळजळ कमी करतो, ज्यामुळे सुरकुत्या आणि बारीक रेषा हळूहळू कमी होतात. दररोज याचे सेवन केल्याने तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक मिळते आणि तुम्ही तरुण दिसता.
स्किन केअर करताना ‘या’ चुका करणे टाळा, अन्यथा चेहऱ्यावरील पिगमेंटेशन, पिंपल्समुळे त्वचा होईल खराब
ओमिजा टी
ओमिजा टी चा करा समावेश
पाच वेगवेगळ्या चवींनी समृद्ध ज्यामध्ये तुम्हाला गोड, आंबट, कडू, खारट आणि मसालेदार असा स्वाद येतो हा ओमिजा चहा अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. हा चहा मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतो, ज्यामुळे त्वचेचे वृद्धत्व कमी होते. याचे नियमित सेवन केल्याने त्वचा निरोगी आणि चमकदार राहते आणि त्वचेवर लवकर वृद्धत्व अर्थात सुरकुत्या दिसून येत नाहीत आणि तुमच्या त्वचेवरून तुमचे वयही कळत नाही
जॉब्स टियर्स टी
जॉब्स टीयर्स टी चा करा उपयोग
युल्मु-चा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या चहामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. हा चहा त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यास आणि त्वचेची लवचिकता टिकवून ठेवण्यास मदत करतो. याशिवाय, हा चहा त्वचेतील ओलावा टिकवून ठेवतो, ज्यामुळे त्वचा तरुण आणि ताजी दिसते. कोरियन टी चा वापर तुम्ही नियमित केल्यास त्वचा अधिक चांगली ठेवण्यास नक्कीच मदत होईल. यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्लाही घेऊ शकता.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.