टक्कल पडण्यापूर्वी केसांवर लावा 'हे' घरी तयार केलेले आयुर्वेदिक तेल! केस गळणे होईल कायमचे बंद
केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे किंवा केसांच्या विविध समस्या हे अतिशय सामान्य झाले आहे. केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये महिला कायमच दुर्लक्ष करतात. पण कालांतराने केसांच्या समस्या आणखीनच गंभीर होते आणि केसांमध्ये टक्कल पडते. केसांमध्ये टक्कल पडल्यानंतर महिलांचे सौंदर्य कमी होते तर काहीवेळा महिलांचा आत्मविश्वास कमी होऊन जातो. त्यामुळे केसांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. केसांच्या समस्या वाढल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर, सीरम, लोशन इत्यादी अनेक गोष्टी लावतात. पण तरीसुद्धा फारसा परिणाम दिसून येत नाही. केस सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या केमिकल ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. यामुळे काही काळापुरतेच केस सुंदर आणि चमकदार दिसतात.(फोटो सौजन्य – istock)
चमचाभर तांदळाचा वापर करून घरीच तयार करा महागडी क्रीम, हिवाळ्यातही राहील सुंदर आणि चमकदार त्वचा
केसांवर केलेल्या केमिकल ट्रीटमेंट फारकाळ टिकून राहत नाही. याउलट केस आणखीनच गळून टक्कल पडण्याची जास्त भीती असते. केसांच्या वाढीवर चुकीचे हेअर केअर आणि वातावरणाचा सुद्धा परिणाम दिसू लागतो. त्यामुळे केसांच्या वाढीसाठी नैसर्गिक आणि स्वयंपाक घरातील पदार्थांचा वापर करावा. आज आम्ही तुम्हाला केस गळणे थांबवण्यासाठी आयुर्वेदिक तेल बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. हे तेल महिनाभर केसांवर नियमित लावल्यास केस अतिशय मजबूत आणि घनदाट होतील. केसांवरील नैसर्गिक चमक कायम टिकवून ठेवण्यासाठी घरगुती पदार्थांपासून बनवलेल्या तेलाचा वापर करावा. केमिकल प्रॉडक्टचा वापर केसांच्या वाढीवर गंभीर परिणाम करतात.
हेअर ऑइल बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये सालीसहित ठेचून घेतलेला लसूण आणि कांदे, मोहरीचे तेल घालून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर त्यात मेथी दाणे, कलोंजी, कडीपत्त्याची पाने, कोरफडीचे पान घालून सर्व साहित्य मंद आचेवर व्यवस्थित शिजवून घ्या. सर्व साहित्य शिजून नरम झाल्यानंतर गॅस बंद करून तेल थंड झाल्यानंतर गाळून घ्या. तेल थंड झाल्यानंतर त्यात विटामिन सी कँप्सूल घालून मिक्स करा. तयार केलेले तेल नियमित केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत लावून हलक्या हाताने मसाज करा. केसांच्या वाढीसाठी कायमच केमिकल युक्त नैसर्गिक पदार्थांचा वापर करावा. नैसर्गिक पदार्थ केसांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम करतात.
कांद्यामध्ये असलेले गुणकारी घटक केस मजबूत आणि काळेभोर करण्यासाठी मदत करतात. यामध्ये असलेले सल्फर केसांच्या मुळांना भरपूर पोषण देते. लसूणमध्ये असलेले औषधी गुणधर्म टाळूवर वाढलेला संसर्ग कमी होतो. याशिवाय तेल लावल्यामुळे टाळूवरील रक्तभिसरण सुधारते आणि केसांची झपाट्याने वाढ होते. कलोंजी केसांच्या फोलिकल्सला मजबूत करण्यासाठी मदत करते. कढीपत्त्याच्या पानांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स केसांमधील नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते.






