पायांच्या नसा ब्लॉक झाल्या आहेत? मग 'हे' सोपे उपाय करून तात्काळ मिळावा
धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. यामुळे शरीराची बिघडलेली पचनक्रिया,कामाचा वाढलेला ताण, अपुरी झोप, झोपेची गुणवत्ता खराब होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर सुद्धा तरुणांकडून दुर्लक्ष केले जाते. कोणत्याही समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. त्यात तरुणांमध्ये प्रामुख्याने दिसून येणारी समस्या म्हणजे पायांच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जाते. रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. या समस्येकडे वारंवार दुर्लक्ष केल्यास रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात. पायांच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर पायांमध्ये अतिशय तीव्र वेदना होऊ लागतात.या वेदना वाढल्यानंतर चालताना किंवा उभं राहताना पायांमध्ये वेदना होणे, पाय दुखणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.(फोटो सौजन्य – iStock)
पायांच्या नसा ब्लॉक झाल्यानंतर नसा स्पष्टपणे दिसू लागतात. पायाच्या रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होऊन रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही. नसा ब्लॉक झाल्यानंतर दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करणे आवश्यक आहे. दुर्लक्ष केल्यास ही समस्या आणखीनच वाढून संपूर्ण शरीराला त्रास होतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पायांच्या नसा ब्लॉक झाल्यानंतर कोणते घरगुती उपाय करून तात्काळ आराम मिळवावा, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती. हे उपाय अतिशय प्रभावी ठरतील.
पायांच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर गरम पाण्याचा शेक घ्यावा. गरम पाण्याचा शेक घेतल्यानंतर वेदनांपासून आराम मिळतो. गरम पाण्याची पिशवी किंवा गरम पाण्यात पाय ठेवून तुम्ही बसू शकता. पायाला आलेली सूज आणि वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी गरम पाण्याचा वापर करावा. याशिवाय पाणी गरम करताना त्यात मीठ टाकावे. मिठाच्या पाण्यामुळे सूज लगेच कमी होते.
पायांच्या ब्लॉक झालेल्या रक्तवाहिन्या मोकळ्या करण्यासाठी तुम्ही मालिश सुद्धा करू शकता. मालिश केल्यामुळे नसांना आलेली सूज कमी होते आणि वेदनांपासून लगेच आराम मिळतो. मालिश केल्यामुळे वेदना कमी होतात. याशिवाय मालिश करण्याआधी डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊनच मालिश करावे. अन्यथा पायांच्या नसांना हानी पोहचू शकते.
स्वयंपाक घरातील ‘हा’ पदार्थ खोकला अपचनावर आहे प्रभावी, पावसाळ्यातील सर्व आजारांपासून राहाल लांब
सकाळी उठल्यानंतर नियमित व्यायाम करणे आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. व्यायाम केल्यामुळे शरीर शारीरिक दृष्ट्या सक्रिय राहते. पायांच्या नसा ब्लॉक झाल्यानंतर नियमित व्यायाम करावा. यामध्ये तुम्ही चालणे, स्विमिंग तसेच सायकलिंगसुद्धा करू शकता. नियमित व्यायाम केल्यास नसांमधील रक्तप्रवाह सुरळीत राहील.






