फोटो सौजन्य: istock)
स्वयंपाक करताना स्वयंपाकघरातील भिंतींवर तेल आणि मसाल्यांचे शिडकाव होणे सामान्य आहे. प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असे डाग पाहायला मिळतात. आपण संपूर्ण घर तर स्वछ करतो मात्र बऱ्याचदा या डागांकडे आपले दुर्लक्ष होते आणि मग हे डाग आणखीनच चिवट होऊ लागतात. भिंतीवरील हे डाग स्वयंपाकघराचा लूक खराब करतात आणि कालांतराने गलिच्छ वाटू लागतात. स्वयंपाकघरातील भिंतींवर ग्रीस आणि मसाल्याच्या डागांमुळे तुम्हालाही त्रास होत असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखात अशा काही घरगुती ट्रिक्स सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही स्वयंपाक घरातील हट्टी चिवट डाग क्षणार्धात दूर करू शकता आणि यासाठी तुम्हाला पैसे घालवण्याचीही गरज नाही. या ट्रिक्सच्या मदतीने तुम्ही स्वयंपाकघरातीक घाण भिंतींना नव्यासारखे रूप देऊ शकता.
बेकिंग सोडा आणि व्हिनेगर
बेकिंग सोडा आणि व्हिनेगर हे दोन्ही नैसर्गिक क्लीन्सर आहेत जे हट्टी डाग काढून टाकण्यासाठी खूप प्रभावी ठरतात. यासाठी एका स्प्रे बाटलीमध्ये बेकिंग सोडा आणि व्हिनेगर मिसळून एक द्रावण तयार करा. हे द्रावण भिंतीवरील डागांवर स्प्रे करा आणि 5-10 मिनिटे तसेच सोडून द्या. नंतर स्पंज किंवा मायक्रोफायबर कापडाने भिंती घासून स्वच्छ पुसून घ्या. जर डाग फार चिवट असेल तर ही प्रक्रिया पुन्हा करा. हे मिश्रण तेलाचे डाग सहज विरघळवते आणि भिंतीला हानी पोहोचवत नाही.
डिशवॉशिंग लिक्विड आणि गरम पाणी
डिशवॉशिंग लिक्विड हे ग्रीस कापण्यात पटाईत आहे, त्यामुळे स्वयंपाकघरातील भिंती स्वच्छ करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. यासाठी एका स्प्रे बाटलीमध्ये बेकिंग सोडा आणि व्हिनेगर मिसळून द्रावण तयार करा. हे द्रावण भिंतीच्या डागलेल्या भागावर स्प्रे करा आणि 5-10 मिनिटे सोडा. नंतर स्पंज किंवा मायक्रोफायबर कापडाने घासून स्वच्छ करा. गरम पाणी आणि डिटर्जंटचे मिश्रण ग्रीस लवकर काढून टाकते आणि भिंतींवर अडकलेली घाण सहज साफ करते.
मधूमेह, कॅन्सरग्रस्तांना सरकारचा धक्का! सरकारी नियंत्रणातील औषधांची होणार दरवाढ? नेमकं कारण काय..
लिंबू आणि मीठ
लिंबूमध्ये अम्लीय गुणधर्म असतात, जे ग्रीस काढण्यास मदत करतात, तर मीठ नैसर्गिक स्क्रबर म्हणून काम करते. या दोघांचे एकत्रित मिश्रण भिंतींवरील डाग दूर करण्यास मदत करेल. यासाठी लिंबाच्या रसात मीठ मिसळून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट भिंतीवरील डागावर लावा आणि 5-7 मिनिटे राहू द्या. नंतर स्पंज किंवा कापडाने घासून स्वच्छ करा. भिंत ओल्या कापडाने पुसून कोरडी करा. ही पेस्ट नैसर्गिक आहे, जी डाग काढून टाकण्यासोबतच भिंतींची चमक वाढणवण्यास मदत करते.