गर्भावस्थेत बद्धकोष्ठता झाल्यास काय करावे (फोटो सौजन्य - iStock)
ही केवळ प्रौढांमध्येच नाही तर गर्भवती महिलांमध्येही आढळून येणारी एक सामान्य समस्या आहे. गर्भवती महिलांमध्ये बद्धकोष्ठतेकडे दुर्लक्ष केले जाते. ४० ते ५०% गर्भवती महिलांना कधी ना कधी बद्धकोष्ठतेचा अनुभव येतो. अनेक महिलांना असे वाटते की ही एक किरकोळ समस्या आहे जी स्वतःहून निघून जाईल, परंतु अनियंत्रित बद्धकोष्ठतेमुळे दैनंदिन कार्यात अडथळा येणे, भूक, झोप आणि एकूण आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. डॉ. प्रियंका सोनवणे, स्त्रीरोग तज्ज्ञ, झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटल मुंबई यांनी अधिक माहिती दिली आहे.
काय आहेत कारणं
गर्भधारणेदरम्यान बद्धकोष्ठता होण्याचे एक मुख्य कारण म्हणजे हार्मोनल बदल. प्रोजेस्ट्रॅानची पातळी वाढल्याने पचनसंस्थेतील स्नायूंच्या कार्यावर त्याचा परिणाम होतो. यामुळे आतड्यांमधून अन्न आणि मलची हालचाल मंदावते, ज्यामुळे आतड्यांची हालचाल कमी होते. वाढणारे गर्भाशय देखील आतड्यांवर दाब निर्माण करते, ज्यामुळे त्यांची हालचाल मर्यादित होते आणि मल बाहेर पडण्यास त्रास होतो. हा दाब विशेषतः दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत वाढतो. गर्भधारणेदरम्यान अनेक महिला निरोगी हिमोग्लोबिन पातळी राखण्यासाठी लोहयुक्त आहारदेखील घेतात. ते देखील मल कडक करू शकतात आणि बद्धकोष्ठता निर्माण करू शकतात.
कशी होते गुंतागुंत?
पोटात अस्वस्थता जाणवणे, पोट फुगणे, मूळव्याध किंवा गुद्दाशयाला जखम होणे अशा समस्या सतावतात. यामुळे अनावश्यक चिंता, झोपेचा त्रास देखील होऊ शकतो. सुदैवाने, तज्ञांच्या मदतीने गर्भधारणेदरम्यान बद्धकोष्ठता व्यवस्थापित केली जाऊ शकते.
या महत्त्वाच्या टिप्सचे पालन करा






