(फोटो सौजन्य – Pinterest)
खरंच पाकिस्तानात जाऊन धुरंधरची शूटिंग झाली आहे का? कराचीसारख्या दिसणाऱ्या त्या गल्ल्यांचे सत्य काय…
घाटकोपर पूर्व येथील खाऊ गल्ली शाकाहारी पदार्थांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. इथे डोशाचे असंख्य प्रकार पाहायला मिळतात. चीज बर्स्ट डोसा, मसाला डोसा, मंचुरियन डोसा, आयलंड डोसा आणि अगदी आइस्क्रीम डोसा देखील इथे मिळतो. याशिवाय पाणीपुरी, फाफडा, दाबेली यांसारखे लोकप्रिय स्ट्रीट फूडही येथे खूप चविष्ट मिळते. त्यामुळे शाकाहारी खवय्यांसाठी ही गल्ली म्हणजे एक मोठी मेजवाणीच आहे.
चेंबूर खाऊ गल्ली पंजाबी आणि सिंधी पदार्थांसाठी ओळखली जाते. येथे दाल पकवान, कोकी रगडा, कुलचा यांसारखे खास पदार्थ खाण्यास मिळतात. या गल्लीत फिरताना वेगवेगळ्या चवींमुळे प्रत्येक स्टॉलवर थांबावेसे वाटते. मुलुंड खाऊ गल्ली मसाला वड्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे. इथला गरमागरम मसाला वडा खाण्यासाठी लोक आवर्जून येतात. त्यासोबतच तवा पुलाव, भेळपुरी, पावभाजी यांसारखे पदार्थही येथे चांगल्या चवीचे मिळतात.
मोहम्मद अली रोडवरील खाऊ गल्ली मांसाहारी पदार्थांसाठी संपूर्ण मुंबईत प्रसिद्ध आहे. येथे विविध प्रकारचे मसालेदार मांसाहारी पदार्थ, कबाब, करी आणि खास रेसिपी पाहायला मिळतात. रमजानच्या काळात तर या गल्लीत प्रचंड गर्दी असते. माहीम दर्ग्याजवळील खाऊ गल्ली अनेकांना माहित नसली, तरी ती खूप लोकप्रिय आहे. येथे चिकन तंदुरी, मोमोज, रगडा चाट तसेच विविध मांसाहारी पदार्थ चाखायला मिळतात.
भारतातील अनोख मंदिर जेथील शिवलिंगाची संख्या नेहमी बदलत राहते, विज्ञानालाही ठाऊक नाही यामागच रहस्य
कार्टर रोड खाऊ गल्ली ही तरुणाईमध्ये विशेष फेमस आहे. इंडो-चायनीज पदार्थ, मोमोज, फ्रोजन दही, वॅफल्स असे अनेक पर्याय येथे उपलब्ध आहेत. झवेरी बाजारातील खाऊ गल्ली देखील खूप मोठी असून गुजराती पॅनकेक्स, वडापाव, समोसा, तवा पुलाव, दाबेली आणि मूग डाळ भजी यांसारखे पदार्थ येथे सहज मिळतात. एकंदरीत, मुंबईतील खाऊ गल्ल्या म्हणजे विविध चवींचा खजिना असून, प्रत्येक खवय्याने किमान एकदा तरी या गल्ल्यांचा अनुभव घ्यायलाच हवा.






