२००० सोन्याची नाणी, तोफा, तलवारी; इतिहासातलं सर्वात मोठं रहस्य ‘बॉम जीझस’ जहाज ५०० वर्षांनी वाळवंटातून आल ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Bom Jesus shipwreck : जगाच्या इतिहासात जहाजांशी संबंधित अनेक गूढकथा आहेत. काही समुद्रात बुडालेली, काही कधीच सापडली नाहीत आणि काहींनी तर शतकानुशतके लोकांच्या कुतूहलाला जागं ठेवलं. अशाच एका जहाजाचा रहस्यभेद नुकताच आफ्रिकन वाळवंटात झाला. तब्बल ५०० वर्षांपूर्वी पोर्तुगालहून भारताकडे निघालेलं “बॉम जीझस” (Bom Jesus) हे जहाज समुद्रात बुडालं होतं. शतकानुशतकं हरवलेलं हे जहाज अखेर २००८ मध्ये नामिबियाच्या वाळवंटात सापडलं. त्याच्या मलब्यातून हजारो पौंड तांबे, मौल्यवान कलाकृती आणि तब्बल २००० सोन्याची नाणी बाहेर आली. हा शोध पुरातत्वशास्त्रातील अलीकडच्या काळातील सर्वात मोठा आणि रोमांचक शोध मानला जातो.
७ मार्च १५३३ रोजी पोर्तुगालमधील लिस्बन बंदरातून “बॉम जीझस” हे जहाज भारताकडे रवाना झालं होतं. त्या काळात भारताशी पोर्तुगालचे व्यापारी संबंध मजबूत होते. भारतातून मसाले, रेशीम आणि मौल्यवान वस्तू नेण्यासाठी अनेक जहाजं पोर्तुगालकडून ये-जा करत असत. मात्र, “बॉम जीझस” भारतापर्यंत पोहोचूच शकलं नाही. समुद्रातील भीषण वादळाने ते जहाज किनाऱ्यावर आदळलं आणि बुडालं. शतकानुशतकं या जहाजाचा ठावठिकाणा कुणालाच लागला नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Tariffs : ट्रम्पची आर्थिक खेळी! अमेरिकेवरील $37.18 ट्रिलियनचे कर्ज फेडण्यासाठी हा भाला मोठ्ठा ‘Tariff’ तमाशा
२००८ मध्ये नामिबियाच्या एका हिऱ्यांच्या खाणीत संशोधन सुरू असताना कामगारांना काही विचित्र धातूचे तुकडे आढळले. पुढील तपासणीत ते तुकडे एखाद्या जुन्या जहाजाचे असल्याचे समोर आले. उत्खनन करताच शास्त्रज्ञ थक्क झाले. कारण समोर आलेल्या मलब्यात फक्त लाकडाचे तुकडेच नव्हते, तर कांस्य वाट्या, धातूचे खांब, चांदीची नाणी, प्राचीन तलवारी, तोफा, खगोलीय उपकरणे, कंपास आणि सुमारे ५०० वर्षांपूर्वीची बंदूकही सापडली. पण सगळ्यात मोठा आश्चर्याचा धक्का बसला तो सोन्याच्या २००० नाण्यांचा खजिना पाहून.
तज्ञांच्या मते ही सोन्याची नाणी अत्यंत शुद्ध सोन्यापासून बनवलेली आहेत. त्याचबरोबर हजारो पौंड तांब्याचे पिंडही जहाजाच्या मलब्यातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. हे सर्व खजिन्याचं मूळ मूल्य आजच्या काळात अब्जावधी रुपयांत मोजलं जातं. या शोधामुळे इतिहासकारांना त्या काळातील आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भारताच्या जागतिक स्थानाबद्दल महत्त्वपूर्ण माहिती मिळते.
जहाजाजवळ मानवी अवशेष फारसे आढळले नाहीत. त्यामुळे तज्ञांचा अंदाज आहे की काही खलाशी वाचले असावेत किंवा वादळात समुद्रात वाहून गेले असावेत. जहाजाचा कवच खडकावर आदळून उलटल्यानंतर ते झपाट्याने पाण्यात बुडाले. मात्र, काळाच्या ओघात किनाऱ्याचे पाणी मागे सरकल्याने ते मलबे आता वाळवंटात दिसू लागले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Timelapse Video : भारताचे नभांगणातील सौंदर्यदर्शन! शुभांशू शुक्ला यांनी ISS वरून टिपला भारताचा जादुई टाइमलॅप्स
दक्षिण आफ्रिकन सागरी पुरातत्व संशोधन संस्थेचे डॉ. नोली यांनी सांगितले की, नामिबियाचा हा किनारा वादळांसाठी कुप्रसिद्ध आहे. अशा ठिकाणी जहाज बुडालं हे आश्चर्यकारक नाही; पण इतक्या मोठ्या प्रमाणावर सोने-नाणी आणि ऐतिहासिक वस्तू सापडल्या, हे विलक्षण आहे. “बॉम जीझस” हा आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर सापडलेला सर्वात मौल्यवान आणि सर्वात जुना जहाज अवशेष मानला जातो.
हा शोध स्पेर्गेबिएट या “निषिद्ध क्षेत्रा”त लागला. येथे साधारण लोकांची प्रवेश मर्यादित असते, कारण इथे हिऱ्यांचा मोठा साठा आहे. डायमंड कंपनी डीबीयर्स आणि नामिबिया सरकार यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली. खजिना उघडकीस आल्यावर या भागाकडे जगभरातील इतिहासकार, पुरातत्त्वज्ञ आणि संशोधकांचे लक्ष वेधले गेले.
आज ५०० वर्षांपूर्वीच्या या जहाजाचा शोध लागल्यामुळे केवळ पोर्तुगाल-भारत व्यापार इतिहासच उजेडात आला नाही, तर त्या काळातील समुद्री प्रवास, व्यापारी स्पर्धा आणि खजिन्यांच्या देवाणघेवाणीबद्दलही नवी दृष्टी मिळाली आहे. “बॉम जीझस”चा खजिना केवळ संपत्तीचा साठा नाही, तर मानवी इतिहासाचा एक अनमोल वारसा आहे.