बुद्ध पौर्णिमेच्या लाडक्या प्रियजनांना पाठवा मंगलमय शुभेच्छा
संपूर्ण जगाला शांतता, दया, क्षमा आणि संयमाची शिकवण दिली. याशिवाय अजूनही गौतम बुद्ध अनेकांचे प्रेरणास्थान आहेत. गौतम बुद्धांचा जन्म वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता. याशिवाय यंदाच्या वर्षी 12 मे ला बुद्ध पौर्णिमा साजरा केली जाते.भगवान गौतम बुद्धांनी संपूर्ण जगभरात बौद्ध धर्माचा प्रसार केला.त्यांनी कायम संपूर्ण जगाला शांततेचा संदेश दिला. जगभरात अनेक ठिकाणी बुद्ध धर्माचे अनुयायी आहेत. त्यामुळे आज आम्ही भगवान बुद्धांच्या जन्मदिनानिमित्त प्रियजनांना पाठवण्यासाठी काही शुभेच्छा सांगणार आहोत. या शुभेच्छा पाठवून तुम्ही लाडक्या प्रियजनांना मंगलमय शुभेच्छा पाठवू शकता.(फोटो सौजन्य – iStock)
भगवान बुद्धांच्या शांती व करुणेच्या मार्गावर
आपण सर्वांनी वाटचाल करूया…
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
भगवान बुद्ध तुमच्या जीवनात सुख-शांती भरू दे
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा !
बुद्ध पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावरवचन घेऊयात
आपल्या मनात प्रेम आणि शांती जागवूयात
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
बुद्ध जयंतीच्या पावन दिनी
भगवान बुद्धांची शिकवण मनी उतरवूया.
बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
भगवान बुद्ध तुम्हाला ज्ञान,शांती प्रदान करो
तुमच्या कुटुंबात आनंद, सुख येवो
“बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!
भगवान बुद्धांची शिकवण
तुमच्या आयुष्याला नवी दिशा देवो
बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
भगवान बुद्धांच्या आशीर्वादाने
तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत
तुमच्या कुटुंबात सुख समृद्धी येवो
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा…
भगवान बुद्धांची शिकवण
जगभरात पसरवण्याचा घेऊया वसा
बुद्धांच्या शिकवणीचा उमटवुया ठसा
बुद्ध पौर्णिमेच्या कोटी कोटी शुभेच्छा..!
भयाने व्यापत या विश्वात
दयाशील वृत्तीचा मनुष्यच
निर्भयपणे राहू शकतो…
बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
एक छोटी मेणबत्ती हजारो मेणबत्यांना प्रकाश देऊ शकते,
तसाच बुद्ध धम्माचा एक विचार तुमचं आयुष्य उज्वल करू शकतो,
धम्मप्रसाकरक भगवान गौतम बुद्धांच्या जन्मदिवसाच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा
सत्याला साथ देत राहा,
चांगलं विचार करा, चांगलं बोला,
प्रेमाच्या प्रवाहाप्रमाणे वाहत राहा,
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रत्येकजण भगवान बुद्धांच्या ध्यानात तल्लीन असतो आणि
त्यांच्या हृदयात शांती नांदत असते,
म्हणूनच ही बुद्ध पौर्णिमा सर्वांसाठी खास आहे,
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा
प्रत्येकजण बुद्धाच्या ध्यानात मग्न आहे,
त्यांच्या हृदयात शांती वास करते,
म्हणूनच ही बुद्ध पौर्णिमा
प्रत्येकासाठी खूप खास आहे.
अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे,
दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे,
विश्व वंदनीय गौतम बुद्ध,
यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा !
बुद्ध पौर्णिमेची रात्र
आज आपल्या आयुष्यातील
अज्ञानाचा अंधकार दूर करेल
आणि आपल्याला शांती व ज्ञानमार्गाच्या
मार्गाकडे घेऊन जावो!
बुद्ध जयंतीच्या हार्दिक
Mother’s Day 2025: आईवरील ‘या’ खास कविता बनवेल तुमचा मातृदिन अजूनच स्पेशल शुभेच्छा..!
क्रोधाला प्रेमाने,
पापाला सदाचारने,
लोभाला दानाने आणि
असत्याला सत्याने जिंकता येते..
बुद्ध पौर्णिमा निमित्त,
आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा !