एकेकाळी इंग्रजांनीच बनवलेले भारतातील हे ठिकाण परदेशांसाठी आहे बॅन, काय आहे कारण?
जगातील सर्वाधिक पाऊस भारताच्या या ठिकाणी होतो! निसर्गप्रेमींची पहिली पसंत आहे हे ठिकाण…
या ठिकाणी फिरु शकत नाही पर्यटक
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील डेहराडून जिल्ह्यात असलेले चकराता हे एक सुंदर थंड हवेचे ठिकाण आहे. तथापि, येथील परिसर भारतीय सेनेच्या रणनीतिकदृष्ट्या खूप महत्त्वपूर्ण मानला जातो. येथे एक लष्करी तळ आणि संरक्षणाशी संबंधित अनेक संवेदनशील क्षेत्रे आहेत. हेच कारण आहे की या ठिकाणी परदेशी पर्यटकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. वैध व्हिसा असतानाही परदेशी पर्यटकांना इथे येण्यास परवानगी दिली जात नाही. जर तुम्हालाही हे हिल स्टेशन पाहायचे असेल तर तुम्ही विकेंडला या ठिकाणी फिरण्याचा प्लॅन करु शकता. मुंबईहून शांत आणि सुंदर चकराताचे अंतर सुमारे १६५० किलोमीटर आहे. इथे जाण्यासाठी आधी डेहराडूनला यावे लागते आणि मग बस किंवा टॅक्सी करुन चकराता गाठता येते.
इंग्रजांनी केली होती स्थापना…
ठिकाणाच्या इतिहासाविषयी बोलणे केले तर १८६६ मध्ये या ठिकाणाची स्थापना करण्यात आली होती. त्याकाळी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या मनोरंजनासाठी आणि लष्करी कारवायांसाठी या ठिकाणाची स्थापना करण्यात आली. स्वातंत्र्यानंतर हे ठिकाण भारतीय सेनेच्या नियंत्रणाखाली आले आणि सुरक्षेच्या कारणास्तव इथे पर्यटकांच्या येण्यावर बंदी घालण्यात आली.
UNESCO च्या यादीत ताजमहालसह देशातील 10 ठिकाण सामील, फिरण्यासाठी ठरतील परफेक्ट
फिरण्यासाठीची ठिकाणे
देवदार आणि बांबूच्या जंगलांची वेढलेले चकराता हे ठिकाण ट्रेकिंग आणि तेथील नैसर्गिक सुंदरतेसाठी खास करुन ओळखले जाते. निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण म्हणजे कोणत्या स्वर्गाहून कमी नाही. इथे तुम्ही टायगर फॉल्स, बुधर लेणी, चिलमिरी नेक, देववन आणि लखमंडल अशा प्रमुख पर्यटनस्थळांना भेट देऊ शकता. विदेशी पर्यटकांना इथे येण्यास बंदी असली तर भारतीयांना मात्र चकराता फिरण्याची मुभा आहे.






