(फोटो सौजन्य: istock)
आपले विवाहित जीवन सुखी, आनंदात जावे असे प्रत्येक दाम्पत्याला वाटत असते. नात्याच्या सुरुवातीला तर दोन्ही व्यक्तींमध्ये प्रेम भरपूर असते मात्र हळूहळू याची परिभाषा काहीशी बदलत जाते आणि नात्यात दुरावा जाणवू लागतो. यासाठी जोडीदारांचा समतोल आणि परस्पर समजूतदारपणा महत्त्वाचा ठरतो. महिलांचा स्वभाव हा क्षणाक्षणाला बदलत जातो ज्यामुळे अनेकदा पुरुषांना तो काहीसा त्रासदायक वाटू लागतो. आपल्या पत्नीला आलेला राग दूर करण्यासाठी किंवा तिला आनंदी ठेवण्यासाठी फक्त महागडे गिफ्ट्स आपली मदत करू शकतात असे त्यांना वाटते मात्र असे नाही…
प्रख्यात आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रात विवाहसंबंधित काही महत्त्वाचे सल्ले देऊन ठेवले आहेत, यांचे पालन करून तुम्ही तुमचे विवाहित जीवन आणखीन सुखकर करू शकता. कोणत्या गोष्टी करून पती पत्नीला खुश करू शकतात ते आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
आदरपूर्वक वागणूक
चाणक्यनीतीनुसार, कोणतेही नटे जर दीघकाळ चालवायचे असेल तर एकमेकांना आदरपूर्वक वागणूक देणे फार गरजेचे आहे. पत्नीला दुय्यम स्थान न देता तिच्या विचारांचा, तिचे मातांचा आदर करा. अनेकदा पुरुष मंडळी आपल्या निर्णयांमध्ये पत्नीला सहभागी करत नाहीत मात्र हे फार चुकीचे आहे. निर्णय प्रक्रियेत पत्नीचा सहभाग तुमचे नाते घट्ट करण्यास मदत करते आणि तुमच्या आयुष्यातील तिचे महत्त्व अधोरेखित करते.
मोकळा संवाद
कोणतेही नाते टिकवण्यासाठी आपापसातील संवाद होणे महत्त्वाचा आहे. यामुळे मनातील भावना मोकळेपणाने बोलता येतात आणि एकमेकांना समजूनही घेतले जाते. तुमच्या रोजच्या जीवनात काय घडले किंवा तुमच्या पत्नीचा दिवस कसा गेला याविषयी थोडा वेळ काढून संवाद करा. संवादतून अनेक गोष्टी ठीक करता येतात आणि एकमेकांना आधारही दिला जातो. यामुळे मनातील ताणतणाव दूर होतात आणि आपलेपणाची भावना वाढते.
औषधी गुणधर्मांनी युक्त या हिरव्या ज्यूसचे करा सेवन; आठवड्याभरातच अतिरिक्त चरबी जाईल वितळून
प्रेम व्यक्त करा
आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेकजण आपल्या पत्नीला पुरेसा वेळ देत नाहीत. तुम्हीही असे करत असाल तर ते वेळीच टाळा. दररोज एकत्र वेळ घालवा, संवाद साधा, सुट्टीच्या दिवशी फिरायला जा आणि पत्नीला प्रेमाची वागणूक द्या. कठीण प्रसंगी तिला आधार द्या, जे तिच्यासाठी आनंदाचे कारण बनू शकते. अनेकदा मोठमोठे गिफ्ट्सही ज्या गोष्टी करत नाहीत, प्रेमाच्या चार शब्द त्या गोष्टी करून दाखवतात. नवऱ्याने पत्नीच्या सुख-दुःखात सहभाग घेतला, तिला आदर दिला, विश्वासाने नाते निभावले की पत्नी आपोआपच खुश राहते.