रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी 'या' पद्धतीने करा केळीचे सेवन
शरीर कायमच निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. आहारात खाल्लेले पदार्थ थेट शरीरावर परिणाम करतात. त्यामुळे कायमच पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. बऱ्याचदा धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सतत काम करत राहिल्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होते आणि शरीरात आवश्यक घटकांची कमतरता निर्माण होते. शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी आणि पोषण वाढवण्यासाठी सप्लिमेंट्स तर कधी एनर्जी ड्रिंक्स प्यायले जातात. पण यामुळे फारसा परिणाम शरीरावर दिसून येत नाही. अशावेळी आहारात नियमित २ केळी खावी. केळी खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात आणि शरीराचे कार्य सुधारते. केळ्यांमध्ये पोटॅशियम आणि सोडियमसारखे इलेक्ट्रोलाइट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात, ज्यामुळे शरीराचा उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.(फोटो सौजन्य – istock)
केळ्यांमध्ये विटामिन -सी, फायबर आणि मॅग्निज इत्यादी घटक मुबलक प्रमाणात आढळून येतात. केळी खाल्ल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा भरून काढण्यासाठी केळी खाण्याचा सल्ला दिला जातो. आज आम्ही तुम्हाला नियमित दोन केळी खाल्ल्यास शरीराला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. केळी खाल्ल्यामुळे शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून निघते आणि आरोग्य सुधारते.
शरीरात वाढलेली बद्धकोष्ठता, अपचन, ऍसिडिटी, गॅस इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी नियमित सकाळी उठल्यानंतर दोन केळी खावी. केळी खाल्ल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. यामध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्यांची हालचाल सुधारते. याशिवाय पचनक्रिया अधिक सुरळीत होते. रोजच्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात. पोटात वाढलेल्या आम्लपित्त आणि गॅसवर नियंत्रण ठेवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात केळी खावी.
वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. डिटॉक्स ड्रिंक किंवा सप्लिमेंटचे सेवन केल्यामुळे शरीराचे तात्पुरते वजन कमी होते, पण पुन्हा एकदा वजन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करावे. वजन कमी करण्यासाठी नियमित २ केळी खाल्ल्यास शरीराला अनेक फायदे होतात.केळी खाल्ल्यामुळे लवकर भूक लागत नाही, पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यामध्ये कमी कॅलरीज असतात.
झपाट्याने कमी होईल १० किलो वजन! पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स
केळीमध्ये मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणावर आढळून येते. यामध्ये असलेल्या कोलेजनमुळे त्वचा कायमच तरुण राहते. अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्समुळे त्वचेचे होणारे नुकसान टाळण्यासाठी नियमित २ केळी खावीत. केळी खाल्यामुळे चेहऱ्यावर वाढलेला थकवा, अशक्तपणा कमी होण्यास मदत होते आणि त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार दिसते.






