महिनाभर नियमित करा केशरच्या पाण्याचे सेवन
किमतीने महाग असलेले केशर आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. केशरचा वापर जेवणातील गोड पदार्थ किंवा दूध मिक्स करून पिण्यासाठी केला जातो. यामध्ये असलेले गुणधर्म आरोग्य, त्वचा आणि केसांसाठी प्रभावी आहे. पूर्वीच्या काळापासून केशरचा वापर औषधी गुणधर्मांसाठी केला जात आहे. भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये केशरचे उत्पादन घेतले जाते. याशिवाय जम्मू आणि काश्मीरच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर केशरची शेती केली जाते. याशिवाय केशरला विज्ञानामध्ये क्रोकस सॅटिव्हस असे देखील म्हणतात. केशरची किंमत इतर मसाल्यांच्या तुलनेत अतिशय महाग आहे. तरीसुद्धा अनेक लोक केशरचा दैनंदिन आहारात वापर करतात.(फोटो सौजन्य – iStock)
मधुमेह, कॅन्सरग्रस्तांना सरकारचा धक्का! सरकारी नियंत्रणातील औषधांची होणार दरवाढ? नेमकं कारण काय..
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले केशर अजूनही औषध म्हणून अनेक घरांमध्ये वापरतात. याशिवाय त्वचा खराब झाल्यानंतर किंवा त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केशरच्या पाण्याचे सेवन करावे. हे पाणी त्वचा आतून स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी मदत करते. रात्री झोपताना तुम्ही दुधात केशर टाकून पिऊ शकता. आज आम्ही तुम्हाला महिनाभर नियमित केशरचे पाणी प्यायल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
केशरच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे:
साथीच्या आजारांमुळे किंवा बदलत्या वातावरणामुळे शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधरण्यासाठी केशरचे नियमित पाणी प्यावे. यासाठी अर्धा ग्लास पाण्यात दोन काड्या केशर टाकून १ तास तसेच ठेवा. त्यानंतर केशर त्यात मिक्स झाल्यावर पाण्याचे सेवन करा. हे पाणी महिनाभर नियमित प्यायल्यास शरीराची पचनक्रिया सुधारेल आणि शरीराला अनेक फायदे होतील. केशरमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीराची वाढतात. यामुळे सर्दी खोकला आणि इतर आजारांपासून शरीराचा बचाव होतो.
सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी केशरच्या पाण्याचे सेवन करावे. या पाण्याच्या सेवनामुळे त्वचेचा रंग बदलतो, त्वचेवरील पिंपल्स आणि मुरुमांचे डाग निघून जातात. याशिवाय यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेची गुणवत्ता सुधारतात. डागविरहित त्वचेसाठी केशरच्या पाण्याचे सेवन करावे.
पचनसंबंधित समस्या असलेल्या लोकांनी केशरच्या पाण्याचे सेवन करावे. यामध्ये असलेले गुणधर्म शरीर स्वच्छ करतात आणि शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकतात. बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचनाच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी केशरचे पाणी प्यावे. पोटात वाढलेली जळजळ आणि पित्ताची समस्या दूर करण्यासाठी केशरचे पाणी प्यावे.