Recipe : मसालेदार अमृतसरी छोले चपाती, भाकरी, कुलचे, भात अशा सर्वांसोबतच चवीला फार अप्रतिम लागतात. पंजाबची ही फेमस भाजी तुम्ही घरीही सहज तयार करु शकता. चला रेसिपी नोट करुन घेऊयात.
(फोटो सौजन्य: Youtube)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
अमृतसरी छोल्यांची ख्याती देशभर प्रसिद्ध आहे.
हे मसालेदार छोले तुम्ही घरीही तयार करु शकता.
चला याची रेसिपी जाणून घेऊया.
पंजाबी खाद्यसंस्कृती म्हटली की सर्वप्रथम आठवण येते ती मसालेदार, सुगंधी आणि चवदार पदार्थांची. त्यामध्ये अमृतसरी छोले हा एक अत्यंत लोकप्रिय आणि पारंपरिक पदार्थ मानला जातो. पंजाबमधील अमृतसर शहरातील खास मसाल्यांच्या मिश्रणामुळे या छोल्यांना वेगळी चव आणि आकर्षक रंग मिळतो. गरमागरम भटुरे, कुलचे, पुरी किंवा साध्या चपातीसोबत अमृतसरी छोले अप्रतिम लागतात. घरच्या घरी सहज उपलब्ध साहित्य वापरून ही रेसिपीतयार करता येते. पाहुण्यांसाठी, रविवारच्या खास जेवणासाठी किंवा सणासुदीच्या मेनूसाठी हा पदार्थ उत्तम पर्याय ठरतो. चला यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.