'या' भारतीय पदार्थांच्या सेवनामुळे झपाट्याने वाढतो मधुमेह! आहारात अजिबात करू नका सेवन
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच सामोसा खायला खूप जास्त आवडतो. या पदार्थाला भारतीय फास्टफूडचा राजा असे म्हणतात. सामोसा बनवताना त्यात मैदा, बटाटा, हिरवी मिरची इत्यादी अनेक वेगवेगळ्या पदार्थांचा वापर केला जातो. या पदार्थांमध्ये असलेल्या घटकांमुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढते आणि शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. सामोसा तळण्यासाठी वापरले जाणारे तेल पुन्हा पुन्हा गरम करून इतर पदार्थ बनवण्यासाठी सुद्धा वापरले जाते. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांनी सामोसा खाणे टाळावे.
पाणीपुरीचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. आंबट तिखट चवीची पाणीपुरी खाताना जितकी गोड लागते तेवढीच आरोग्यासाठी सुद्धा घातक आहे. पाणीपुरीच्या पुऱ्या तळलेल्या जातात. यामध्ये कार्बोहायड्रेट आणि फॅट भरपूर असतात. आंबट तिखट पदार्थांच्या सेवनामुळे पचनक्रियेवर गंभीर परिणाम दिसून येतात. खायला चविष्ट लागणाऱ्या पदार्थांमुळे पचनाच्या समस्यांसोबत आरोग्यासंबंधित इतरही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे मधुमेह किंवा पचनाच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांनी पाणीपुरीचे सेवन करणे टाळावे.
दिसायला पौष्टिक दिसणारी पावभाजी आरोग्यासाठी अजिबात चांगली नाही. कारण पावभाजी बनवताना रंगाचा वापर केला जातो. खायचा रंग चवीसाठी चांगला लागत असला तरीसुद्धा आरोग्यासाठी अजिबात चांगला नाही. पाव खाल्ल्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि शरीरात उच्च कॅलरीज वाढू लागतात. आहारात कायमच उच्च कॅलरीज असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे वजन वाढण्यासोबतच शरीराला इतर गंभीर आजारांची लागण होते. पाव भाजीतील कार्बोहायड्रेट्स आणि पावातील साखर मधुमेह वाढवण्यास कारणीभूत ठरतात.
मधुमेह म्हणजे काय?
मधुमेह हा असा आजार आहे ज्यात रक्तातील ग्लुकोजची पातळी (रक्तातील साखर) खूप जास्त होते.इन्सुलिन हा स्वादुपिंडाद्वारे तयार होणारा एक हार्मोन आहे, जो ग्लुकोजला पेशींमध्ये ऊर्जा म्हणून वापरण्यासाठी मदत करतो.
मधुमेहाची लक्षणे:
वारंवार लघवी होणे, जास्त तहान लागणे, थकवा जाणवणे, वजन कमी होणे, दृष्टी अंधुक होणे.प्री-डायबिटीज (मधुमेहाच्या आधीची स्थिती) मध्ये अनेकदा कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, त्यामुळे नियमित आरोग्य तपासणी करणे महत्त्वाचे आहे.
मधुमेहाचे व्यवस्थापन कसे करावे?
फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य यांसारखे पदार्थ खा.दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम करा.धूम्रपान आणि मद्यपान टाळा, कारण ते मधुमेहाची गुंतागुंत वाढवू शकतात.






