डायलिसिस केंद्रे नाममात्र दरात संस्थांना करून देणार उपलब्ध; ३० वर्षांसाठी केला जाणार करार, पालिकेचे पीपीपी मॉडेल
मुंबई महापालिकेच्या आरोग्यसेवा पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) मॉडेलला विरोध होत असतानाही महापालिकेने तीन डायलिसिस केंद्रे नाममात्र दराने तब्बल ३० वर्षांसाठी खासगी संस्थांना देण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका शहराच्या तीन वेगवेगळ्या भागात डायलिसिस केंद्रे उभारणार आहे. मात्र या तीनही भागांतील रुग्णसंख्या, गरज आणि केंद्रांची क्षमता वेगवेगळी असतानाहो सर्व ठिकाणी एकसारख्याच अटींवर करार करण्यात आला आहे. जमीन, इमारत व मूलभूत पायाभूत सुविधा महापालिकेच्या असतील, तर खासगी संस्थांनी फक्त यंत्रसामग्री बसवून केंद्र चालवायचे आहे, उत्पन्न मात्र पूर्णपणे खासगी ऑपरेटरकडे जाणार आहे. १० लाख रूपये तीन वर्षांचा सरास्सी टर्नओव्हर निचित करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – istock)
गर्भावस्थेत वाढतोय उच्च रक्तदाब धोका! ‘कामा आणि ऑलब्लेस’मधील अभ्यासात करण्यात आला धक्कादायक खुलासा
शरीराला कोणत्याही गंभीर आजरांची लागण झाल्यानंतर संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. यामुळे शारीरिक आणि मानसिक संतुलन बिघडते. बऱ्याचदा किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर डायलिसिस करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र सर्व सामान्य घरातील व्यक्तींनी डायलिसिससारख्या गंभीर आजारावर उपचार करणे शक्य होत नाही. काहींना महिन्यातून एकदा तर काहींना प्रत्येक आठवड्याला डायलिसिस करावे लागते. यामुळे संपूर्ण आरोग्य बिघडून जाते.
या निविदेत तीन वर्षाचा सरासरी टर्नओव्हर अवधा १० लाख रुपये इतकाच निश्चित करण्यात आला आहे. एवढचा कमी पात्रता अटी ठेवल्यामुळे ‘निवडक संस्थांसाठीच रस्ता मोकळा केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. निविदेतील अटीनुसार रुग्णांकडून एका डायलिसिससाठी जास्तीत जास्त ५०० शुल्क आकारता येणार आहे. मात्र रुग्णसंख्या, मनपाकडून मिळणारी किमान ४० टक्के रुगणांची हमी, तसेच भाई आणि पायभूत खर्च शून्य असल्याने खासगी संस्थांना कमी जोखमीमध्ये मोठा नफा मिळण्याची शक्यता असल्याचे आरोगातम्यांचे मत आहे.
चौपीपी करारानुसार दोन शिफ्टमध्ये नियमित डायलिसिस सेवा, २४ तास आपत्कालीन सेवा तसेच बीपीएल व पिवळ्या केशरी शिधापत्रिकाधारकांना मोफत उपचार देंगे बंधनकारक आहे. मात्र संपूर्ण नियंत्रण खासगी हातात असल्याने या अटी प्रत्यक्षात कितपत पाळल्या मातील, यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Ans: जेव्हा मूत्रपिंड रक्तातील टाकाऊ पदार्थ (युरिया, क्रिएटिनिन) आणि अतिरिक्त पाणी काढून टाकू शकत नाहीत, तेव्हा डायलिसिस मशीनद्वारे रक्त शुद्ध केले जाते.
Ans: हेमोडायलिसिस, पेरिटोनियल डायलिसिस
Ans: रक्तातील युरिया, क्रिएटिनिन आणि इतर टाकाऊ पदार्थ काढून टाकणे.






