रेबीज झाल्यानंतर माणूस खरंच कुत्र्यासारखा भुंकतो का? जाऊन घ्या यामागील कारण आणि रेबीजची लक्षणे
रेबीज झाल्यानंतर माणूस खरंच कुत्र्यासारखा भुंकतो का?
रेबीजची लक्षणे?
कुत्रा चावल्यानंतर कोणती काळजी घ्यावी?
जगातील सगळ्यात घातक आणि जीवघेणा आजार म्हणजे रेबीज. घराच्या बाहेर खेळताना किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे कुत्रा चावल्यानंतर किंवा नख लागल्यानंतर दुर्लक्ष केले जाते. पण कुत्रा चावल्यानंतर दुर्लक्ष केल्यास शरीरसंबंधित अतिशय गंभीर आजाराची लागण होऊ शकते. कुत्रा चावल्यानंतर माणूस कुत्र्यासारखा वागतो किंवा भुंकतो, असे समज गैरसमज कायमच मानले जातात. प्रामुख्याने रेबीज हा आजार पिसाळलेला कुत्रा, मांजर किंवा माकड चावल्यामुळे होणारा विषाणूजन्य आजार आहे. या विषाणूचा थेट परिणाम मानवाच्या मज्जासंस्थेवर आणि मेंदूवर होतो. त्यामुळे कुत्रा चावल्यानंतर सगळ्यात आधी जखम डेटॉल किंवा डॉक्टरांनी दिलेल्या औषधाने स्वच्छ करणे फार आवश्यक आहे. मज्जासंस्थेवर परिणाम झाल्यामुळे माणसाचा मृत्यू होण्याची जास्त शक्यता असते. या आजाराला सायलंट किलर, असे म्हंटले जाते.(फोटो सौजन्य – istock)
आपल्यातील अनेकांना कायमच वाटते की, कुत्रा चावल्यानंतर माणसं कुत्र्यासारखी भुंकतात, कुत्र्यासारखी वागतात. पण डॉक्टरांच्या मते, रेबीज झालेल्या रुग्णाच्या शरीरात होणाऱ्या वेदनांमुळे आवाजावर परिणाम होतो. तसेच कुत्रा चावलेल्या व्यक्तीला रेबीज झाल्यास त्याच्या मेंदूवर थेट परिणाम होऊन शारीरिक संतुलन बिघडून जाते. त्यामुळे कुत्रा चावल्यास किंवा नख लागल्यास क्षणाचाही विलंब न करता तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. चला तर जाणून घेऊया रेबीज झाल्यानंतर माणूस खरंच कुत्र्यासारखा भुंकतो का?यामागील कारण आणि रेबीजची लक्षणे.
डॉक्टरांच्या मते, रेबीज झालेल्या व्यक्तीच्या शरीरात असंख्य बदल होतात. मेंदूवर परिणाम झाल्यामुळे स्नायूंचे आकुंचन होतात, ज्यामुळे रुग्णाला पाणी पिणे सुद्धा कठीण होऊन जाते. रेबीजमुळे हायड्रोफोबिया होण्याची जास्त शक्यता असते. हा आजार मेंदूच्या नसांवर थेट परिणाम करतो. ज्याच्या परिणामामुळे रुग्णांच्या वागणुकीमध्ये अनेक बदल दिसू लागतात. पाणी पिण्याची भीती वाटणे, पाणी दिसल्यास घाबरून किंचाळणे इत्यादी लक्षणे शरीरात दिसू लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Liver Day 2026: वेळीच करा उपाय, टाळा Liver Cancer, तज्ज्ञांनी दिला योग्य सल्ला
रेबीज झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये फ्लू सारखी लक्षणे दिसू लागतात. ताप, डोकेदुखी, अस्वस्थता, चिंता, घशात पेटके येणे, गिळण्यास त्रास होणे, पाण्याची भीती, जास्त लाळ गळणे, मानसिक गोंधळ, खूप जास्त राग येणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. कारण रेबीज झाल्यानंतर मेंदूला मोठी सूज येते. ही सूज रुग्णाची विचार करण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट करून टाकते. बिघडलेल्या मानसिक स्थितीमुळे ओरडणे किंवा विचित्र हालचाली,सतत चिडचिड, कायमच गोंधळल्यासारखे वाटू लागते. रेबीज झाल्यानंतर रुग्णांच्या लाळग्रंथींवर ताबा राहत नाही आणि घशाच्या स्नायूंमुळे गिळणे कठीण होऊन जाते. शरीरात दिसणारी ही वरील लक्षणे पाहिल्यामुळे रुग्ण पिसाळलेल्या कुत्र्यासारखा दिसतोय, असे सगळ्यांचं वाटते.
Ans: नाही, माणूस प्रत्यक्षात कुत्र्यासारखा भुंकत नाही. पण Rabies मुळे मेंदूवर परिणाम होतो आणि व्यक्तीमध्ये आक्रमकता, असामान्य वर्तन आणि आवाजात बदल दिसू शकतो.
Ans: रेबीज हा एक गंभीर विषाणूजन्य आजार आहे, जो प्रामुख्याने कुत्रा, मांजर किंवा इतर प्राण्यांच्या चाव्यामुळे पसरतो.
Ans: ताबडतोब जखम साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवा आणि डॉक्टरांकडे जाऊन लस (vaccine) घ्या. विलंब जीवघेणा ठरू शकतो.






