शरीरावर जमा झालेली अतिरिक्त चरबी झपाट्याने वितळवण्यासाठी नियमित करा 'या' पेयांचे सेवन
जगभरात वाढलेल्या वजनाने अनेक लोक त्रस्त आहात. वजन वाढण्यास अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. वाढलेल्या वजनामुळे शरीरावर अतिरिक्त चरबी जमा होण्यास सुरुवात होते. बिघडलेली जीवनशैली, जंक फूडचे सेवन, कामाचा वाढलेला तणाव, अपुरी झोप, पोषक तत्वांचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. यामुळे वजन वाढण्याची जास्त शक्यता असते. वजन वाढल्यानंतर मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल इत्यादी अनेक आजारांची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे वाढलेले वजन कमी करताना आहारात बदल करून शरीराला पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.शरीरावर वाढलेल्या अतिरिक्त चरबीमुळे बऱ्याचदा महिलांचा आत्मविश्वास कमी होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करताना कोणत्या पेयांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
‘या’ लोकांनी चुकूनही करू नका हेअर ट्रान्सप्लांट, ट्रीटमेंटनंतर होऊ शकतो मृत्यू, वेळच व्हा सावध
शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून प्यावे. यामुळे शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाते. शरीरावर साचून राहिलेली चरबी कमी करण्यासाठी कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून प्यावे. यामध्ये असलेले विटामिन सी शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी आहे. कोमट पाणी आरोग्यासाठी प्रभावी आहे. शरीरात साचलेल्या विषारी घटकांमुळे आरोग्याला हानी पोहचते. हे घटक योग्य वेळी बाहेर पडून जाणे आवश्यक आहे.
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेला ओवा कोमट पाण्यासोबत खाल्यास शरीरात सकारात्मक बदल दिसून येतो. शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि चयापचय सुधारण्यासाठी ओव्याचे पाणी प्यावे. तसेच शरीरात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी ओव्याचे पाणी प्यावे. ओव्याच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे अॅसिडिटी आणि गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो.
आपल्यातील अनेकांना सकाळी उठल्यानंतर ग्रीन टी पिण्याची सवय असते. ग्रीन टी मध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि कॅटेचिन शरीरावर वाढलेली चरबी वेगाने कमी करतात आणि शरीर स्वच्छ करतात. वजन कमी करताना इतर कोणत्याही पेयांचे नियमित सेवन करण्याऐवजी ग्रीन टी चे सेवन करावे. शरीरातील कॅलरीज बर्न करण्यासाठी ग्रीन टी अतिशय प्रभावी आहे.
मेथीच्या पाण्यात भरपूर फायबर आढळून येते. शरीरामध्ये साचलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मेथीच्या पाण्याचे सेवन करावे. मेथीचे पाणी तयार करताना एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा मेथीचे दाणे भिजत ठेवा. रात्रभर दाणे व्यवस्थित भिजल्यानंतर मेथीचे दाणे गाळून पाणी प्यावे. यामुळे लवकर भूक लागणार नाही.