टॅनिंगमुळे चेहरा खूप जास्त काळवंडलेल्यासारखा वाटतो? त्वचेवरील चमक वाढवण्यासाठी 'या' पदार्थांचा करा वापर
बऱ्याचदा कामाच्या धावपळीमध्ये स्वतःसाठी जास्त वेळ मिळत नाही. सतत काम राहिल्यामुळे आरोग्य आणि त्वचेकडे दुर्लक्ष होत. यामुळे त्वचा काहीशी काळवंडून जाते. याशिवाय वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम त्वचेवर लगेच दिसून येतो. सतत बाहेर फिरल्यामुळे त्वचेवर डेड स्किन जमा होते. चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन त्वचा अतिशय निस्तेज करून टाकते. त्वचेवरील तेज कमी झाल्यानंतर चेहरा आजारी असल्यासारखा वाटू लागतो. याशिवाय त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी महिला पार्लरमध्ये जाऊन फेशिअल, क्लीनअप किंवा इतर वेगवेगळ्या ट्रीटमेंट करतात. यामुळे त्वचा काहीकाळ खूप जास्त सुंदर आणि चमकदार दिसते.(फोटो सौजन्य – istock)
चेहऱ्यावरील चमक कमी झाल्यानंतर त्वचा अतिशय निस्तेज होऊन जाते. त्वचेवर डेड स्किन, टॅनिंग वाढल्यानंतर चेहऱ्यावरील ग्लो काहीसा कमी होऊन जातो. हा ग्लो पुन्हा मिळवण्यासाठी महिला सतत स्किन केअर प्रॉडक्ट आणि वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट करून घेतात. पण केमिकल ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला त्वचेवरील चमक वाढवण्यासाठी स्वयंपाक घरातील कोणत्या पदार्थांचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक वाढेल.
चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन कमी करण्यासाठी घरच्या घरी स्क्रब तयार करावा. स्क्रब लावल्यामुळे डेड स्किन कमी होईल आणि त्वचा अधिक चमकदार दिसेल. स्क्रब तयार करण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरमधून ओट्सची पावडर तयार करून घ्या. तयार केलेली पावडर वाटीमध्ये घेऊन त्यात टोमॅटोचा रस आणि दही घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर हातांना पाणी लावून हलक्या हाताने मसाज करून घ्या. ५ मिनिटं झाल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
दुपारी किंवा संध्याकाळच्या वेळी चेहऱ्यावर स्क्रब लावावा आणि रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर नाईट क्रिम लावावी. नाईट क्रिम तयार करण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये दूध घेऊन त्यात बदाम भिजत ठेवा. त्यानंतर बदामाची साल काढून दुधात बदाम उगाळून घ्या. तयार केलेल्या पेस्टमध्ये केशर टाकून मिक्स करून घ्या. तयार केलेल्या क्रीममध्ये कोरफड जेल मिक्स करून घ्या. ही क्रीम व्यवस्थित मिक्स करून बंद डब्यात भरून ठेवा. यामुळे त्वचा चमकदार दिसेल.