(फोटो सौजन्य: istock)
आजकाल प्रेमाच्या व्याख्या फार बदलल्या आहेत. पूर्वीप्रमाणे प्रेमात पडत आता तितकं कठीण राहिलं नाही. आपल्याला एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, त्याचा सहवास आवडला की आपोआपच व्यक्ती प्रेमात पडतो मात्र गोष्ट इथेच संपत नाही. तुम्ही चित्रपटातील तो डायलॉग तर नक्कीच ऐकला असेल की, ‘प्रेम करणं सोपं असतं मात्र ते टिकवणं तितकंच कठीण’! अनेकदा नातेसंबंधांमध्ये गोष्टी बिघडू लागल्या की लोकांकडे ब्रेकअप हा पर्याय शिल्लक असतो. अनेकदा आपण रागात आपले नाते तोडतो खरे पण त्यांनतर आपल्या त्या व्यक्तीचे कमी जाणवू लागते.
असं म्हणतात की, पहिलं प्रेम हे कधीच विसरता येत नाही. अशात बऱ्याचदा लोकांच्या मनात आपल्या एक्सला दुसरा चान्स देण्याचा विचार येत असतो मात्र हे खरंच योग्य आहे की नाही यामध्ये ते मनातल्या मनातच झुरत असतात. नातेसंबंधात दुसरी संधी देण्याचा निर्णय मनापेक्षा बुद्धीने घायला हवा. जर तुमचा एक्स तुमच्याकडे परत येण्याचा प्रयत्न करत असेल तर जरा थांबा आणि हा निर्णय विचारपूर्वक घ्या. आपल्या एक्सला पुन्हा तुमच्या आयुष्यात घ्यायचं की नाही याबाबत जर तुम्ही कन्फ्युज असाल तर आजचा हा लेख तुमच्या कामी येईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, काही संकेतांवरून आपल्या एक्सला आणखीन एक चान्स द्यायचा की नाही ते ओळखू शकता.
एक्सने चुका मान्य केल्यात का?
जर तुमचा एक्स परत येण्याबद्दल बोलत असेल, तर आधी पाहा की त्याने त्याचे जुने वागणे आणि चुका प्रामाणिकपणे स्वीकारल्या आहेत का? जर त्याने प्रामाणिकपणे आपल्या चुका मान्य केल्या असतील आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न केला असेल तर ते एक सकारात्मक चिन्ह आहे. पण जर तो जुन्या गोष्टी समोर आणत राहिला, स्वतःला योग्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करत राहिला किंवा तुम्हाला दोष देत राहिला, तर तो रेड सिग्नल असू शकतो.
तो मॅच्युर झाला का?
कोणत्याही नात्याला पुन्हा संधी देण्यापूर्वी हे पाहणे आवश्यक आहे की तुमचा एक्स पूर्वीपेक्षा अधिक समजूतदार आणि जबाबदार झाला आहे का? जर तो आता त्याच्या जबाबदाऱ्या समजू लागला असेल, त्याच्या निर्णयांबद्दल गंभीर असेल आणि तुमच्यासोबत चांगल्या भविष्याची योजना करत असेल, तर हे एक चांगले चिन्ह आहे. पण जर तो अजूनही त्याच बालिश वृत्तीत असेल, त्याच्या आयुष्यात स्थिरता नसेल, तर पुन्हा नातेसंबंध जोडण्यात काही अर्थ नाही.
ग्लास स्किन मिळवण्यासाठी Vitamin-E करेल तुमची मदत; फक्त ‘या’ पद्धतींचा अवलंब करा
यावेळेस तो बदल घडवून आणण्यास खरच तयार आहे का?
नात्यात गोड शब्द आणि आश्वासने पुरेशी नसतात, खरी गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे बदल. जर तुमचा एक्स त्याच जुन्या गोष्टींची पुनरावृत्ती करत असेल परंतु प्रत्यक्षात काहीही बदलण्यास तयार नसेल तर तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. जर तो खरोखरच त्याच्या चुका सुधारण्यासाठी कठोर परिश्रम करत असेल आणि त्याच्या शब्दांतून नव्हे तर कृतीतून सिद्ध करत असेल, तर त्याला दुसरी संधी देणे योग्य ठरेल. पण जर तो फक्त माफी मागून आणि प्रेमळ शब्द बोलून तुमची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असेल, तर तो पूर्वीसारखाच असल्याचे लक्षण आहे.
आदर महत्त्वाचा
नात्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आदर आणि समानता. जर पूर्वीच्या नात्यात फक्त तुम्हीच तडजोड करत असाल, फक्त तुम्हीच ॲडजस्ट करत असाल, तर या वेळी तो नातं संतुलित करायला तयार आहे का हे पाहणं महत्त्वाचं आहे. जर त्याने आता तुमच्या भावनांचा आदर केला, तुमचे विचार आणि गरजा समजून घेण्याचा प्रयत्न केला तर हे नाते सुधारू शकते. पण तरीही तो फक्त स्वतःचाच विचार करत असेल आणि तुमच्या भावनांना महत्त्व देत नसेल, तर या नात्याकडे परत न आलेलेच बरे.
तुम्ही खरंच माफ करू शकणार आहात?
सर्वात महत्त्वाचा प्रश्न – तुम्ही आपल्या एक्सला मनापासून माफ करू शकणार आहात का? केवळ एकटेपणामुळे किंवा भावनांमुळे एखाद्याला दुसरी संधी देणे योग्य नाही. जर तुम्ही तिच्यासोबत नवीन सुरुवात करण्यास तयार असाल तर, भूतकाळ सोडून पुढे जा, तर हे नाते आणखी एक संधी देण्यास पात्र आहे. परंतु जर तुम्हाला अजूनही त्याचा भूतकाळातील विश्वासघात किंवा चुका आठवत असतील आणि तुमच्या मनात राग किंवा वेदना असेल तर स्वतःला त्रास देण्यात काही अर्थ नाही.
विचार करून निर्णय घ्या
रिलेशनशिपमध्ये दुसरी संधी देणे कधीकधी योग्य असू शकते, परंतु हा निर्णय पूर्ण शहाणपणाने आणि सावधगिरीने घेतला पाहिजे. फक्त एकटेपणा किंवा भावनिक दबावातून आपल्या एक्सला तुमच्या आयुष्यात पुन्हा जागा देऊ नका. सगळ्या गोष्टींचा नीट विचार करा आणि मगच निर्णय घ्या.