चेहऱ्यावर आलेल्या मुरुमांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांचा करा वापर
देशभरात सगळीकडे नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे. या नऊ दिवसांमध्ये सगळीकडे एक वेगळाच उत्साह असतो. महिला नऊ वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसतात. तसेच संध्याकाळी देवीच्या पूजेनंतर गरबा, दांडियाची आयोजन केले जाते. पण हवामान आणि आहारात होणाऱ्या बदलांमुळे चेहऱ्यावर मुरूम, पिंपल्स किंवा त्वचेसंबंधित इतरही समस्या उद्भवू लागतात. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स किंवा मुरुमांचे डाग घालवण्यासाठी मुली पार्लरमध्ये जाऊन फेशिअल आणि क्लीनअप करून घेतात. पण तरीसुद्धा त्वचेमध्ये कोणताच बदल दिसून येत नाही. याशिवाय महिला महागड्या स्किन ट्रीटमेंट, केमिकल फेशिअल इत्यादी अनेक वेगवेगळ्या ट्रीटमेंट करतात. पण तरीसुद्धा त्वचा सुंदर दिसत नाही. बाजारात उपलब्ध असलेल्या हानिकारक केमिकलयुक्त क्रीमचा वापर केल्यामुळे त्वचेची गुणवत्ता पूर्णपणे खराब होऊन जाते.(फोटो सौजन्य – istock)
चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, मोठे फोड आणि मुरूम काही केल्या कमी होत नाहीत. वारंवार केमिकल उत्पादनांचा वापर त्वचेसाठी केल्यामुळे चेहरा खराब होऊन जातो. चेहऱ्यावर वाढलेले डाग घालवण्यासाठी कोणत्याही क्रीमचा वापर न करता घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर आलेले डाग आणि फोड घालवण्यासाठी मध आणि हळदीचा वापर कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. स्वयंपाक घरातील पदार्थ त्वचेवर नैसर्गिक चमक कायम टिकवून ठेवतात.
त्वचेवरील चमक वाढवण्यासाठी हळद आणि मधाचा वापर करावा. यासाठी वाटीमध्ये हळद आणि मध घेऊन मिक्स करून घ्या. तयार केलेली पेस्ट मुरूम किंवा फोड असलेल्या भागांवर लावून १० ते १५ मिनिटं तशीच ठेवा. त्यानंतर पाण्याने त्वचा स्वच्छ करून घ्या. हा उपाय केल्यामुळे चेहऱ्याला आलेली सूज कमी होण्यासोबतच लालसरपणा कमी होण्यास मदत होईल. हळद आणि मधामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचेमधील विषाणू कमी होण्यास मदत होईल. चेहऱ्यावरील बॅक्टेरिया कमी होण्यास मदत होते. हळद लावल्यामुळे चेहऱ्यावरील मुरूम कमी होतात आणि त्वचा चमकदार दिसते.
हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. ज्यामुळे त्वचेमध्ये वाढलेली जळजळ कमी होते. रात्री झोपण्याआधी हळद आणि मधाचा लेप त्वचेवर लावून झोपल्यास डाग आणि पिंपल्स कमी होतील. याशिवाय मधाचा वापर केल्यामुळे त्वचा चमकदार दिसते आणि चेहऱ्यावरील ग्लो वाढतो. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा हळदीचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यास त्वचा अतिशय सुंदर होईल.