केसांच्या वाढीसाठी मेथी दाणे गुणकारी
वातावरणातील बदलांचा परिणाम केसांच्या वाढीवर दिसून येतो. सतत केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे, टाळूवर खाज येणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागल्यानंतर केसांची वाढ थांबून जाते. त्यामुळे केसांच्या निरोगी वाढीसाठी आहारासोबतच केसांची काळजी घेणे सुद्धा गरजेचे आहे. केसांच्या घनदाट वाढीसाठी अनेक महिला बाजारात मिळणारी महागडी उतपादने वापरतात. पण याचा फारसा परिणाम केसांवर दिसून येत नाही. अशावेळी पुन्हा कोणतेतरी नवीन प्रॉडक्ट वापरल्यामुळे केसांच्या वाढीवर त्याचा परिणाम दिसून येतो. त्यामुळे केसांच्या निरोगी वाढीसाठी केमिकल युक्त गोष्टी वापरण्यावेजी घरगुती पदार्थांचा वापर करावा. ज्यामुळे केसांची वाढ भरभर होते.
केसांच्या वाढीसाठी मेथी दाणे प्रभावी आहेत. केसांच्या वाढीसाठी प्रामुख्याने घरगुती पदार्थांचा वापर करावा. घरगुती पदार्थ केसांच्या वाढीसाठी प्रभावी ठरतात. मेथी दाण्यांमध्ये फायबरचे प्रमाण मोत्याच्या प्रमाणावर आढळून येते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला केसच्या वाढीसाठी मेथी दाण्यांचा वापर कसा करावा, याबद्दल सांगणार आहोत. चाल अंतर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: वयाच्या चाळीशीमध्ये चेहऱ्यावर सुरकुत्या दिसतायत? मग करा ‘या’ लाल तेलाचा वापर, त्वचा दिसेल तरुण
हे देखील वाचा: दिवसातून किती वेळा Pads बदलावे?
कढीपत्त्याच्या पानांमध्ये मुबलक प्रमाणात जीवनसत्वे आढळून येतात, जे आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. कढीपत्त्याच्या पानांमध्ये विटामिन ए, विटामिन बी, विटामिन सी आणि विटामिन बी2 आढळून येते. यामुळे पचनक्रिया निरोगी राहते. अनेकदा पचनासंबंधित समस्या उद्भवू लागतात. या समस्या जाणवू लागल्यास तुम्ही कढीपत्याच्या पानांचे सेवन करू शकता.केसांच्या वाढीसाठी कढीपत्ता अतिशय प्रभावी आहे.