(फोटो सौजन्य:Pinterest)
ऑम्लेट, हा एक असा पदार्थ आहे जो सर्वांनाच खायला फार आवडतो. झटपट तयार होणारा हा पदार्थ अनेकांच्या नाश्त्याच्या एक अविभाज्य भाग आहे.जगभरातील लोक फार आवडीने या पदार्थाचा आस्वाद घेतात. पटकन भूक भागवण्यासाठी काहीतरी खायचे असेल किंवा सहज चवदार पदार्थ खायचे असतील तर ऑम्लेट हा उत्तम पर्याय आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ऑम्लेट बनवण्याची कल्पना सर्वप्रथम कोणाच्या मनात आली? आम्ही तुम्हाला सांगतो की, ऑम्लेट पदार्थाचाही एक फार मनोरंजक इतिहास आहे जो आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
ताज्या द्राक्षांपासून मनुके कसे तयार करायचे? फार सोपी आहे पद्धत; आजच जाणून घ्या

ऑम्लेट हा शब्द फ्रेंच भाषेतून आला आहे. 17 व्या शतकाच्या उत्तरार्धात फ्रेंच कूकबुक ‘क्युझिन बुर्जुआ’मध्ये याची प्रथम नोंद झाली. तथापि, तत्सम शब्द ‘अलुमेट’ 14 व्या शतकापासून वापरात होता. पण ही फक्त नावाची बाब आहे, हे देखील शक्य आहे की ही डिश फ्रान्सच्या आधीही कुठेतरी अस्तित्वात असावी. कारण त्याच्या इतिहासात डोकावून पाहिल्यास हे लक्षात येते की ही डिश कोणत्याही एका ठिकाणाची किंवा काळाची निर्मिती नाही, तर ती वेगवेगळ्या देशांच्या संस्कृतींमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात विकसित झाला आहे.
जगातील जवळजवळ प्रत्येक संस्कृतीने कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ऑम्लेट बनवले आहे. प्राचीन रोमन लोक अंडी आणि दुग्धजन्य पदार्थ मिसळून ऑम्लेट बनवत असत. त्याच वेळी, इराण आणि जपानमध्ये, ऑम्लेटसारखे पदार्थ थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवले गेले. त्यामुळे वेगवेगळ्या संस्कृतींनी गरम तव्यावर अंडी फेटून भाजी किंवा मसाले घालून ऑम्लेट बनवायला सुरुवात केली. तथापि, आता ते जगभर बनवले जाते आणि वेगवेगळ्या प्रकारे बनवले आणि खाल्ले जाते.
ऑम्लेटची प्रसिद्ध कथा
ऑम्लेटच्या इतिहासातील एक प्रसिद्ध कथा नेपोलियन बोनापार्टशी संबंधित आहे. असे म्हटले जाते की, नेपोलियन आणि त्याचे सैन्य एका लहान गावातून जात होते, जेथे स्थानिक हॉटेल मालकाने त्यांना ऑम्लेट दिले. नेपोलियनला त्याची चव इतकी आवडली की त्याने दुसऱ्या दिवशी संपूर्ण गावातून अंडी गोळा करून सैन्यासाठी एक मोठा ऑम्लेट बनवण्याचा आदेश दिला. ही कथा खरी असो वा नसो, पण यानंतर फ्रान्समधील बेसिरेस शहरात दरवर्षी एक मोठा ऑम्लेट उत्सव साजरा केला जाऊ लागला, यामध्ये शेकडो अंड्यांपासून बनवलेले ऑम्लेट संपूर्ण शहरातील लोकांना दिले जाते.
सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा कुरकुरीत डाळवडा, झटपट तयार होईल हेल्दी पदार्थ
ऑम्लेटचा शोध कोणी लावला?
असे दिसते की ऑम्लेटचा शोध कोणा एका व्यक्तीने किंवा ठिकाणाने लावला नसून, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे हा पदार्थ विकसित होत गेला. कोणत्याही डिशची मुळे शोधणे सोपे नाही, परंतु असे नक्कीच म्हणता येईल की ही डिश जगातील प्रत्येक भागात आवडीने बनवली आणि खाल्ली जाते. इतक्या वर्षांनंतरही याची लोकप्रियता अजूनही काही कमी झाली नाही.






