कायम तरुण आणि चमकदार त्वचेसाठी दैनंदिन आहारात करा 'या' फळाचे सेवन
निरोगी आरोग्यासाठी आहारात फळे, भाज्या आणि पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. शरीराला सर्वच ऋतूंमध्ये पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांची आवश्यकता असते. मात्र बऱ्याचदा वाढत्या प्रदूषणाचा आणि बदलत्या वातावरणाचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यानंतर त्वचा आणि केसांमध्ये बदल दिसून येतात. वारंवार केस गळणे, त्वचेचा रंग बदलणे, तणाव, पिंपल्स मुरुमांची समस्या इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर बरीच लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करतात. मात्र सतत गोळ्या औषधांचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकते. त्यामुळे रोजच्या आहारात फळांचे नियमित सेवन करावे.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळा वाढल्यानंतर त्वचेचा रंग हळूहळू बदलून जातो. कडक उन्हात बाहेर गेल्यानंतर त्वचा काळी पडणे, त्वचेवर आलेले पिंपल्स, कोरडेपणा इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या क्रीमचा वापर केला जातो. मात्र कोणत्याही क्रिम्सचा वापर करण्याऐवजी आहारात बदल करून आरोग्याची काळजी घ्यावी. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी आहारात फळांचा समावेश करावा. टोमॅटोप्रमाणे लाल असलेली सफरचंद आरोग्यासाठी अतिशय गुणकारी ठरतात.
सफरचंद खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये आढळून येणारी जीवनसत्वे, पोषक घटक आणि इतर गुणकारी घटक शरीरासाठी आवश्यक आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्स आढळून येतात. याशिवाय त्वचेवरील हरवलेला ग्लो पुन्हा परत मिळवण्यासाठी नियमित सफरचंद किंवा सफरचंदच्या रसाचे सेवन करावे. यामुळे त्वचेचा रंग सुधारेल आणि त्वचा चमकदार सुंदर दिसू लागेल.
त्वचेवरील हरवलेली चमक पुन्हा परत मिळवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नाश्त्यात नियमित सफरचंद खावे. सफरचंद खाल्यामुळे त्वचेवर पुन्हा नव्य्सार्जही चमक येते. यामुळे तुमचा चेहरा कायम ताजेतवटवीत दिसतो. त्वचेचा योग्य समतोल राखण्यासाठी आहारात नियमित कोणते ना कोणते विटामिन सी युक्त फळं खावे.
चेहऱ्यावर 2 आठवड्यापर्यंत रोज तांदळाचे पाणी लावल्याने काय होते? डॉक्टरने केला धक्कादायक दावा
उन्हाळ्यात चेहऱ्यावर सतत मुरूम किंवा पिंपल्स येऊ लागतात. मुरुमांच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आहारात नियमित सफरचंद आणि बीटच्या रसाचे सेवन करावे. यामुळे मुळांपासून मुरूम स्वच्छ होतात आणि शरीराला अनेक फायदे होतात. सफरचंदात फायटोन्यूट्रिएंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स इत्यादी घटक आढळून येतात.