माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे 92 व्या वर्षी निधन, 'या' आजाराने होते त्रस्त
भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे काल निधन झाले. नवी दिल्ली एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. सिंह 26 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळी घरी अचानक बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने नवी दिल्लीतील एम्समध्ये आणण्यात आले. येथे त्यांना इमरजेंसी विभागात दाखल करण्यात आले. डॉ. सिंग यांना रात्री 8:06 वाजता एम्समध्ये आणण्यात आले, तेथे डॉक्टरांच्या पथकाने त्यांना वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. मात्र, सर्व प्रयत्न अयशस्वी झाले आणि रात्री 9.51 वाजता डॉ.मनमोहन सिंग यांना मृत घोषित करण्यात आले. मनमोहन सिंग यांनी 92 वर्षी अखेरचा श्वास घेतला, ते हार्टचे रुग्ण होते. हृदयविकाराच्या उपचारासाठी त्यांच्यावर अनेकवेळा हार्ट सर्जरीही झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना श्वासाचा त्रास होता, ज्यामुळे त्यांना रुग्णालयात तातडीने दाखल करण्या आले. मनमोहन सिंह यांच्या फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांना यावेळी ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं होत. डॉ. मनमोहन सिंग यांना झालेल्या या आजाराची नक्की लक्षण कोणती आहेत ते आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
फुफ्फुसाच्या संसर्गाची लक्षणे
ज्या लोकांना फुफ्फुसाच्या संसर्गाचा त्रास असतो, त्यांना सतत खोकला येऊ शकतो. यामुळे वायुमार्ग आणि फुफ्फुसांना जळजळ होते. ब्राँकायटिस (Bronchitis) किंवा न्यूमोनिया (Pneumonia) यांसारखे श्वसनाचे आजार होऊ शकतात.
श्वास घेण्यास त्रास होतो आणि छातीत दुखू लागते
या आजारात व्यक्तीला श्वास घेण्यास प्रचंड त्रास निर्माण होत असतो. फुफ्फुसाच्या संसर्गाव्यतिरिक्त, हे हृदयविकाराच्या झटक्यासह इतर अनेक धोकादायक आजारांचे लक्षण असू शकते, त्यामुळे वेळीच उरावर योग्य ते निदान करणे आवश्यक आहे. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे त्या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो आणि छातीत देखील तीव्र वेदना जाणवू शकतात.
ताप-थंडी-थकवा
कोणत्याही प्रकारच्या संसर्गामुळे शरीरात जळजळ निर्माण होऊ शकते. यामुळे आरोग्याच्या समस्या जाणवू लागतात. फुफ्फुसाच्या संसर्गामुळेही अशा अनेक समस्या जाणवू शकतात. यामुळे ताप, थंडी वाजने तसेच शरीरात थकवा जाणवणे अशा आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. या सर्व लहान-सहान आरोग्याच्या समस्या दर्शवतात की तुमचे शरीर संसर्गाशी लढण्याचा प्रयत्न करत आहे.
जीवनात यशाची शिडी चढायची असेल तर जरूर शिकून घ्या ‘हे’ 5 Social Skills
फुफ्फसांच्या संसर्गावर घरगुती उपाय
बहुतेक फुफ्फुसाच्या आजारावर औषधे उपलब्ध आहेत. परंतु काही घरगुती उपचार देखील आहेत, जे जलद किंवा लक्षणांपासून आराम मिळवून देण्यास मदत करू शकतात. यासाठी तुम्ही खाली दिलेल्या काही घरगुती उपायांना फॉलो करू शकतात.